मूल : आदिवासी समाज संघटना आणि महीला व पुरूष बचत गटाच्या वतीने स्थानिक कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात रविवार दि. २० नोव्हेंबर २०२२ रोज रविवारला आदिवासी सांस्कृतिक महोत्सव तथा आदिवासी वर वधू परिचय मेळावा आयोजित केला आहे.
आयोजित सांस्कृतिक महोत्सवात समस्त आदिवासी जमातींच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करणार असून त्यासाठी आपणा सर्वांची मदत हवी आहे. बोलीभाषा जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे. बोलीभाषातुन गीत आणि जमातीचे वैशिष्ट्ये सादर करणे तसेच पारंपरिक नृत्य सादर करणे वाद्याची ओळख आणि विविध कार्यक्रम प्रसंगी वाजवले जाणारे वाद्यावरील ताल यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सादर करण्यात येणाऱ्या या उपक्रमात आदिवासी समाजाच्या कला जोपासणा-या ज्या मंडळीना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावे. त्यांना प्रवास खर्च देण्यात येईल, ढेमसा, रेला, घुसाडी वगैरे जे नृत्य आहे त्यांना या कार्यक्रमात सहभाग घेता येईल, उपस्थित कलाकारामधून आपल्या संस्कृतीचे दर्शन इतर जमातीला करता येईल, यामुळे समाज एकत्र जोडल्या जाईल. तसेच सत्कारास पात्र असलेला एखाद्या अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता यांचा सत्कार झाला पाहिजे असं असेल तर त्यांचे नाव सुचवावे. अशी विनंती करण्यात येत आहे. आयोजित कार्यक्रमात आदिवासी मधील विविध जमातीतील युवक, युवतींनी मोठ्या संख्येने वर वधू परिचय मेळाव्यात सहभागी व्हावे. दुर असलेल्या आदिवासी जमाती मधील ज्या युवक युवतींना वधुवर परिचय मेळाव्यात नांव नोंदणी करायचे आहे. त्यांनी ९०४९०93137 नंबर वर व्हिडीओ पाठवा तसेच मॅसेज स्वरूपात बायोडाटा आणि फोटो पाठवावा. पूनर्रविवाह करणाऱ्या इच्छुकांनाही मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. आयोजित मेळाव्यात आदिवासी समाजाची संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आयोजक समजून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन स्थानिक आयोजकांनी केले आहे.