वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वनविकास महामंडळाच्या हद्दीतील घटना

120

मूल : कापूस काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन जागीच ठार केले. ही घटना मूल तालुक्यातील जानाळा शेतशिवाराजवळील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रं. ५२३ मध्ये मंगळवारी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. श्रीमती कल्पणा अरुणा लोनबले वय ४५ वर्षे रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या महिलेचे नांव आहे. तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील श्रीमती कल्पणा अरुण लोनबले हया शेतावर कापुस काढण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने कल्पनावर हल्ला करुन जागीच ठार केले व पार्थिव फरफटत नेले.ज्याठिकाणी मॄतदेह सापडला ते ठिकाण वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रं. ५२३ मध्ये येते. सदर घटनेची माहिती होताच वनविकास महामंडळाचे सहा. व्यवस्थापक खामकर, वनपरिक्षेत्राधिकारी पिंजारी, मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत, क्षेत्र सहा. राकेश कुमरे घटनास्थळी दाखल होवुन शव उत्तरीय तपासणीकरीता मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here