नवभारत कन्या विद्यालय मुल येथे बालक दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न.

105

मूल : बालक दिनानिमित्त मॅजिक बस या संस्थेच्या वतीने नवभारत कन्या विद्यालयाच्या सहकार्याने खेळातून शिक्षण या उपक्रमाद्वारे क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थिनींना क्रिकेटचे नियम अटी समजून सांगण्यात आले. या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे, विस्तार अधिकारी कु. जयश्री गुज्जनवार, वर्षा पिपरे, मुख्याध्यापिका सौ. मंगला सुंकरवार, केंद्रप्रमुख प्रमुख प्रमोद कोरडे, गुरुदेव सेवा मंडळाचे सुखदेव चौथाले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गट शिक्षणाधिकारी वैभव खांडरे, यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मंगला एस. सुंकरवार यांनीही संबोधित केले. मुलींसाठी क्रिकेट खेळण्यासाठी दोन गट तयार करून मॅजिक बस चे अधिकारी अरुण मोहिते व त्यांच्या मार्गदर्शिका यांनी क्रिकेट या खेळाची व इतरही स्पर्धांची धुरा सांभाळली. सर्व विद्यार्थिनींनी या खेळाचा आस्वाद घेतला यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन मॅजिक बसचे अधिकारी अरुण मोहिते यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विद्यालयाच्या शिक्षिका उज्वला चहांदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here