कॅन्सर ग्रस्त पोलीस पाटलीनला संघटनेने दिला मदतीचा हातकॅन्सर ग्रस्त पोलीस पाटलीनला संघटनेने दिला मदतीचा हात

117

कॅन्सर ग्रस्त पोलीस पाटलीनला संघटनेने दिला मदतीचा हात
सामाजिक बांधिलकी जोपासली
भेजगाव – तालुक्यातील जानाळा येथील पोलीस पाटील दर्शना गेडाम या काही दिवसापासून कॅन्सर या आजाराने ग्रस्त आहेत. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना उपचार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही बाब महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या मूल शाखेला माहीत होताच संघटनेने सामाजिक बांधिलकी जोपासत संघटनेच्या वतीने 20000 रुपयाची नगद तात्काळ मदत दर्शना गेडाम यांच्या घरी त्यांना प्रत्यक्ष भेटून सोमवार ला देण्यात आले.
यावेळी तिच्या तब्येतीची विचारपूस करीत योग्य उपचार व काळजी घेण्याचा सल्ला संघटनेच्या वतीने देण्यात आला. पोलीस पाटील संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या मदतीने गेडाम परिवार भारावून गेला असून त्यांनी समाधान व्यक्त केले. संघटनेने दिलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा राजोली चे पोलीस पाटील गोपाल ठाकरे, संघटनेच्या सचिव तथा टोलेवाही येथील पोलीस पाटील सौ संगीता चल्लावार, डोंगरगाव येथील पोलीस पाटील शंकर शेन्डे, चिचाळा येथील पोलीस पाटील विजय दुर्ग आदी पोलीस पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here