आजारी राकेशच्या मदतीला धावले सफाई कामगार

118

मूल : स्थानिक माळी मोहल्ला येथील राकेश राजु निकोडे हा २१ वर्षीय युवक मेंदुच्या आजाराने ग्रस्त असुन सध्या नागपूर येथील एम्स हाँस्पीटल मध्ये उपचार घेत आहे. उपचारार्थ भरती असलेल्या राकेश निकोडे यांचे वडील मृत्यु पावले असुन त्याच्या आईने मोलमजुरी करून राकेशला इयत्ता बारावी पर्यत शिकविले आहे. कौटुंबिक परिस्थिती अभावी राकेशला पुढील शिक्षण घेता आले नाही. हलाखीच्या परिस्थितीत मानसिक रूग्ण असलेल्या लहान बहीणी सोबतच मोलमजुरी करणाऱ्या आईला हातभार लावावा म्हणुन पुढील शिक्षण न घेता राकेश स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापाऱ्याकडे दिवाणजी अत्यंत हलाखीची असल्याने म्हणुन कामाला होता. राकेशच्या मदतीने आई कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवित असताना अचानक राकेशला मेंदुचा आजार जळला. मूल, चंद्रपूर नंतर नागपूर आदी ठिकाणी उपचार घेतल्यानंतर अलीकडे त्याच्या मेंदुची गाठ वाढु लागली. त्याच्या मेंदुच्या गाठीवर शस्ञक्रिया केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगतांना डाँक्टरांनी त्याकरीता मोठा खर्च येणार असल्याचे सांगीतले. परंतु हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत राकेशच्या उपचाराकरीता पैश्याची जुळवा जुळव कशी करायची ? हा प्रश्न त्याच्या आईसमोर निर्माण झाला. स्थानिक समाज व सेवाभावी संस्थानी आर्थिक सहकार्य केल्यास राकेशवर उपचार करता येईल. या आशेवर असतांना स्थानिक सफाई कामगार संघटनेच्या पदाधिका-यांनी दोन हजार रूपयाची तातडीची मदत देवुन पुढेही मदत करण्याची तयारी दर्शवली, मदत देतांना सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप पारचे, उपाध्यक्ष संजय मोगरे, अरविंद सोनटक्के, सविता बघेल, माला मोगरे, सारीका सोने, प्रिती राणे, महेंद्र राणे, दिनेश रगडे, शिवचरण रगडे, वर्षा मुप्पीडवार, पार्वती सोने, ज्योती रगडे, राखी सांडे आदी उपस्थित होते. सफाई कामगार संघटनेच्या मदती नंतर स्थानिक सेवाभावी संस्थानी मुलाच्या आजारावर निदान करण्यासाठी सहकार्याचा हात द्यावा. अशी विनंती आजारी राकेश निकोडे च्या आईने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here