मूल (प्रतिनिधी) तालुक्यातील जानाळा येथील पोलीस पाटील दर्शना गेडाम मागील काही दिवसापासून कॅन्सरने ग्रस्त आहेत. परंतु कौटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना उपचार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही बाब महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या मूल शाखेला माहीत होताच संघटनेने सामाजिक बांधिलकी जोपासत संघटनेच्या वतीने विस हजार रुपयाची मदत दर्शना गेडाम यांना प्रत्यक्ष भेटून दिली. यावेळी संघटनेच्या पदाधिका-यांनी तिच्या प्रकृतीची चौकशी करीत योग्य उपचार व काळजी घेण्याचा सल्ला दिला. पोलीस पाटील संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या मदतीने गेडाम परिवार भारावुन गेला असून त्यांनी संघटनेप्रती कृतघ्नता व्यक्त केली. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे मूल तालुका अध्यक्ष राजोली येथील पोलीस पाटील गोपाल ठिकरे, संघटनेच्या सचिव टोलेवाही येथील पोलीस पाटील सौ संगीता चल्लावार, डोंगरगाव येथील पोलीस पाटील शंकर शेन्डे, चिचाळा येथील पोलीस पाटील विजय दुर्गे आदी पोलीस पाटील उपस्थित होते.