मूल (प्रतिनिधी)
तालुक्यातील पोर्टल न्युजच्या क्षेत्रात आजपासुन मूल टुडे न्युजची भर पडत आहे. स्थानिक पञकारांनी एकञीत येवुन मूल टुडेचा उपक्रम सुरू केला असुन याव्दारे तालुक्यातील विविध घडामोळींच्या माहीतीची मेजवानी वाचकांना नियमित विविध समाज माध्यमाव्दारे उपलब्ध होणार आहे. लक्ष्मीपुजनाच्या मंगल आणि शुभ दिनी मूल टुडे पोर्टल न्युजचा शुभारंभ चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे शुभहस्ते गाजावाजा न करता अत्यंत साध्यापणाने करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे मूल तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष राकेश रत्नावार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र कन्नमवार आदी मान्यवर उपस्थित होते. भ्रमणध्वनी वर मूल टुडे पोर्टल न्युज च्या प्रसारणाची बटन दाबुन संतोषसिंह रावत यांनी मूल टुडेचा शुभारंभ केला. आजपासुन प्रसारीत होत असलेल्या मूल टुडे न्युजचा जनतेनी लाभ घ्यावा. अशी विनंती मूल टुडेच्या संपादक मंडळाने केली आहे. .