उपसरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व, पाच ठिकाणी काँग्रेसचे तर दोन जागी भाजपाचे उपसरपंच, आकापुर, बेंबाळ, गडीसुर्ला, बाबराळा आणि चकदुगाळात काँग्रेस तर उसराळा आणि बोंडाळात भाजप

96

मूल : तालुक्यातील सात ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पाच ग्राम पंचायतीमध्ये काँग्रेसचे तर दोन ग्राम पंचायतींवर भाजपाचे उपसरपंच पदारूढ झाले आहेत. पालकमंञी यांचे कार्यक्षेञातील मूल तालुक्यात सरपंच पदा पाठोपाठ उपसरपंच पदावर काँग्रेसने सात पैकी पाच ग्राम पंचायतीवर उपसरपंच पदारूढ केल्याने भाजप वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.

काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व जि.प. चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात लढविलेल्या सात ग्राम पंचायत निवडणुकीत काँग्रेसने चार ग्राम पंचायतीवर झेंडा फडकविला आहे. त्यापैकी बेंबाळ ग्राम पंचायत मध्ये देवाजी ज्ञानबोईनवार, आकापूर येथे साहील येनगंटीवार यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली. बाबराळा ग्राम पंचायती मध्ये अनिता नाहगमकर तर चक दुगाळा येथे लता सातपुते ह्या उपसरपंच पदी विराजमान झाल्या. गडीसुर्ला ग्राम पंचायत मध्ये भाजप काँग्रेस प्रणित ग्राम विकास आघाडीच्या सरपंच निर्वाचित झाल्या असल्या तरी उपसरपंच पदी काँग्रेसच्या करीश्मा वाढई यांनी बाजी मारली आहे. उसराळा ग्राम पंचयतीमध्ये उपसरपंच पदावर भाजपच्या उज्वला ढोले यांची तर बोंडाला ग्राम पंचायती मध्ये जगदीश बांगरे यांची अविरोध निवड झाली आहे. सात पैकी पाच ग्राम पंचायती मध्ये काँग्रेस पार्टीचे उपसरपंच होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनात राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर, संदीप कारमवार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक अध्यक्ष पवन निलमवार, दीपक वाढई, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, प्रशांत उराडे, करूणा उराडे, राजेंद्र कन्नमवार, बंडू गुरनुले, शांताराम कामडे, सुमित आरेकर, दशरथ वाकुडकर, गोविंद रोहनकर, ओम चावरे, पंकज गोहने, स्वागत वनकर, प्रभाकर सोनुले आदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तर भाजपाकडून पालक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात माजी जि.प अध्यक्ष संध्याताई गुरनुले, चंदू मारगोनवार, नंदकिशोर रणदिवे, प्रशांत समर्थ आदी भाजप पदाधिका-यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here