मूल : जनतेची मागणी आणि गरज लक्षात घेवून मूल येथील उपजिल्हा रूग्णालयाचा विस्तार होणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्नरत असून जिल्हा आरोग्य विभागही त्यासाठी पाठपुरावा करीत आहे. येत्या काही महिण्यात शासनाकडून मूल येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयांचे श्रेणी वर्धन होणार असून १०० खाटांची व्यवस्था राहणार आहे. शिवाय भविष्यातही आरोग्याच्या उपयुक्त योजना मूल येथे कार्यरत करण्याचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न आहेत. त्यामूळे उपजिल्हा रूग्णालयाच्या वापरात असलेली जागा भविष्यात अपुरी पडणार आहे. उपजिल्हा रूग्णालयाच्या वापरात असलेली जागा ही शासन मालकीची असल्याने शासनातर्फे निर्माण होणा-या बिपीएचयु बांधकामासाठी जिल्हा परिषदेला उपजिल्हा रूग्णालयाच्या वापरात असलेली जागा उपलब्ध करून देता येणार नाही. असा निर्णय घेतला असून याबाबतची माहिती जि.प.च्या आरोग्य विभागाला देण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. बंडु रामटेके यांनी दिली. १०० खाटांच्या रूग्णालय प्रस्तावाला जि.प.ची आडकाठी, मूल येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या जागेत इमारत बांधकामाचे प्रयत्न अश्या आशयाची बातमी प्रसिध्द होताच प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. बंडु रामटेके यांनी आज येथील उपजिल्हा रूग्णालयाला भेट देवून जागेची पाहणी नंतर डाॅ. बंडु रामटेके बोलत होते.