मूल : माजी सैनिक संघटना यांच्या सहकार्याने भरारी माजी सैनिक महिला बचत गटाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्य महिला मेळावा नुकताच संपन्न झाला. माजी सैनिक वसाहतीमधील सभागृहाचे आरक्षीत जागेवर संपन्न झालेल्या महीला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महिला बचत गटाच्या अध्यक्षा अंजली सुर होत्या. यावेळी उपाध्यक्ष पुष्पा जंबुलवार, नियाजुनिसा शेख, श्रीमती मेश्राम, सुनिता खोब्रागडे, आदि उपस्थित होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मेळाव्याची सुरूवात झाली. कविता मोहुर्ले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुष्पा जंबुलवार आणि मेळाव्याच्या अध्यक्षा अंजली सुर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना चुल आणि मुल पुरता महिलांनी मर्यादीत न राहता महिलांनी संघटीत होवून बचत गटाच्या माध्यमातून उद्योग धंदा सुरू करून महिलांनी स्वबळावर उभे होण्यासाठी प्रयत्न करावे. असे मत व्यक्त केले. मेळाव्यात वर्षभर राबविण्यात येणाÚया विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यांत आले. कार्यक्रमाचे संचलन कविता गडेकर यांनी तर उपस्थितांचे आभार पंचशीला खोब्रागडे यांनी मानले. राष्ट्रगिताने मेळाव्याची सांगता झाली. यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गडेकर, सचिव बाबा सुर, सल्लागार सहदेव रामटेके, प्रकाश महाडोळे, आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उज्वला रंगारी, करूणा खोब्रागडे, बोरकुटे आदिंनी सहकार्य केले.