मूल : राज्यातील विद्यापीठ कर्मचारी व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या प्रलंबीत असलेल्या प्रमुख सहा मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलनाचा पावित्रा स्विकारला असून २ फेब्रुवारी पासून विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी अवकाश काळात निदर्शने करण्यांत येणार आहेत. १५ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी काळया फिती लावून कामकाज करणार असून १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत. या काळात शासनाने सेवक संयुक्त कृती समितीच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास २० फेब्रुवारी 2023 पासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व संलग्नीत महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर जातील. असा इशारा दिला आहे. यानुषंगाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील कर्मचाऱ्यांशी बेमुदत संपाबाबत चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी सोमवार दिनांक १३ फेबुवारी २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे सभागृहात सभेचे आयोजन केले आहे. आयोजीत सभेला महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रा.जा.बढे, सरचिटणीस डाॅ.आर.बी.सिंह आणि सेवक संयुक्त कृती समितीचे मुख्य संघटक अजय देशमुख आदि पदाधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. आयोजीत सभेला चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी मोठया संख्येनी उपस्थित राहावे. अशी विनंती चंद्रपूर गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रंदई, कार्याध्यक्ष लोमेश दरडे आणि महासचिव अरूण जुनघरे यांनी केले आहे.
Latest article
नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट, मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन...
*नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट*
*मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन करू. संतोषसिंह रावत यांचा इशारा*
मूल : शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरविणाऱ्या...
पंधरा दिवसात पाच जणांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करावा, संतोषसिंह रावत यांचा आंदोलनाचा...
मूल : पंधरा दिवसाच्या कालावधीत तालुक्यातील पाच जणांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला. त्यामूळे जनसामान्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली असून जीवघेण्या वाघांचा बंदोबस्त करावा. अशी...
श्रीकृष्ण हुड्डा यांची सेवानिवृत्त कर्मचारी सेलच्या सोनीपत विधानसभाध्यक्ष पदावर निवड
मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत वाहन चालक पदावर सेवारत राहीलेले, बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे एकेकाळचे...