मूल पंचायत समितीच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन

66

मूल : विद्यार्थ्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांना विद्यादान करणारे शिक्षक शिक्षिका बौध्दिक दृष्ट्या कार्यक्षम असणे गरजेचे आहे. त्यांच्यातही विद्यार्थ्यांना शिकवण्या करिता वेगवेगळ्या कला, खेळ, बौधीक कौशल्य असने अत्यंत आवश्यक असते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरीता गुरू हा सर्व गुण संपन्न  असावा या उद्देशाने मूल पंचायत समितीच्या वतीने सांघिक खेळ, बौद्धिक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम यात, एकांकिका, नक्कल, गितगायन व समुह नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, शिक्षक, शिक्षीका, ग्रामसेवक व पंचायत समितीच्या इतरही कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तालुका क्रिडांगणातील योग भवनात सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संवर्ग विकास अधिकारी चनफने, गट शिक्षणाधिकारी वैभव खांडरे, विस्तार अधिकारी जयश्री गुज्जनवार, वर्षा टिपरे, केंद्रप्रमुख दयाराम भाकरे, यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सांस्कृतिक स्पर्धांचे परिक्षण अशोक येरमे, दामोधर गायकवाड व नुपेश नेवारे यांनी केले. मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here