सावली : राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली आणि महावीर इंटरनॅशनल यांचे सहकार्याने सावली येथे मोतीबिंदु तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच संपन्न झाले. शिबिरामध्यें सावली तालुक्याशिवाय जिल्हयातील विविध तालुक्यातील ६०० च्या वर नेत्र रूग्णांनी नोंदणी करून तपासणी करून घेतली. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ संगीडवार यांनी शिबिराचे औपचारीक उद्घाटन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अशोक खोबरागडे, महावीर इंटरनॅशनलचे प्रकाश खजांची, प्रफुल बुटे, मनोज ताटकोंडावार, अशोक पोटवार आदि उपस्थित होते. शिबिरामध्यें सेवाग्राम येथील नेत्र तज्ञ डाॅ. शुक्ला आणि डाॅ. सचिन ताकसांडे यांचे मार्गदर्शनात वैद्यकिय चमुंनी सहभागी रूग्णांची तपासणी केली, त्यापैकी १७२ रूग्णांना शास्त्रक्रिये करीता सेवाग्राम येथील नेत्र चिकित्सालयात पाठविण्यांत आले. शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रूग्णांना १८ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथील दानशुर व्यक्तीमत्व दीपक पारख यांचे कडून निशुल्क चष्माचे वितरण करण्यांत येणार आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रशांत वासाडे, डाॅ. सचिन चैधरी, प्रा. मुकेश निखाडे, प्रा.स्मिता राऊत, प्रा.कुंदा गुरनूले, प्रा. अरूण राउत, महावीर इंटरनॅशनलचे जगदिश बंसोड, राजेश रक्षणवार, अजय पोटवार, किरण आकुलवार, अजय पोहनकर, रविंद्र ताटकोंडावार, अमोल तिगलवार, राहुन मेरूगवार, विनोद बांगरे, महेश चैधरी यांचेसह महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदानी परिश्रम घेतले