माळी महासंघाच्या प्रदेश महिला कार्याध्यक्ष पदी जि.प. च्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांची निवड

106

मुल – लहानपणा पासूनच समाज कार्याची आवड असलेल्या संध्याताई गुरनुले यांनी सुरवातीला समाज कारणातून राजकारण आणि मग राजकारणातून समाज कारण करण्याचे ध्येय मनाशी बाळगून माळी समाज बांधवांच्या एकत्री कारणासाठी नेहमीच झटत आहेत. माळी समाजातील महिलांच्या सबली करण व सक्षमीकरणासाठी महिला बचत गट स्थापन करुन मार्गदर्शन देण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात महिलांचे अनेक मेळाव्याचे आयोजन यशस्वी पणे पार पाडले आहेत. बहुजन माळी समाजातील एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून संध्याताई गुरनुले यांना एका राजकीय पक्षाने जवळ करुन अनेक पदे त्यांना दिले. एक निगर्वी, मनमिळाऊ, स्वभावाच्या व्यक्ती म्हणून त्यांचा माळी समजा तर्फे त्यांना जिल्हा परिषद मध्ये निवडून आणून सेवा करण्याची संधी दिली. संधीचे सोने करीत मुल तालुक्यात त्यांनी संघटन इतके मजबूत केले.म्हणून त्या सलग पाच टर्म तिन्ही क्षेत्रातून विजयी झाल्या. अजून पर्यंत त्यांची हार मानलेली नाही हे विशेष. याच बळावर दोनदा जिल्हा परिषदेवर अध्यक्ष पदी त्यांची निवड झाली.व त्यांनी आपला कार्यकाळ यशस्वी रित्या पूर्ण केला. आजही समाज त्यांच्या पाठीशी भक्कमणे उभा आहे. ही प्रेरणा माळी महासंघाकडून त्यांना मिळाली. करीता माळी महासंघाने शेगाव येथे आयोजित केलेल्या एका राज्यस्तरीय शिबिरामध्ये माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अविनाश ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष श्री अरुण तीखे साहेब यांनी संध्याताई गुरनुले यांची माळी महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे,प्रदेश अध्यक्ष अरुण तीखे, प्रदेश महासचिव प्रा.नानासाहेब कांडलकर, विभागीय अध्यक्ष चंद्रकांत बोरकर, राजेश जावरकर, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.एन.एस.कोकोडे, चंद्रपूर अध्यक्ष डॉ.संजय घाटे, निलेश खरबडे, नगर सेवक रवी गुरनुले, वंदना तीखे, विजय राऊत, माजी जी.प.सदस्य प्रा .रामभाऊ महाडोरे , भिं.तू. भेंडारे, महासचिव गुरु गुरनुले, जिल्हा सचिव गुरुदास चौधरी, डॉ.पद्माकर लेंनगुरे, दीपक पाटील वाढई, बंडूभाऊ गुरनुले, प्रा. विजय लोनबले, माजी नगराध्यक्ष उषाताई शेंडे, जिल्हा कार्याध्यक्ष राकेश ठाकरे, प्रवीण मोहुरले, प्रा.सुधीर नागोशे, हसन वा, राकेश मोहूर्ले, ओमदेव, मोहूरले, रत्ना चौधरी, तेजस्विनी नागोशे,वंदना गुरनुले, नंदा शेंडे, माधुरी गुरनुले, एड.राजश्री ठाकरे, यांचेसह माळी महासंघाचे पदाधिकारी ,सदस्य,कार्यकर्ते ग्रामीण माळी समाज बांधव, अनेक संघटनांनी संध्याताई गुरनुले यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here