अखेर हिना हिरेन (शहा) गोगरी यांची मृत्युशी झुंज संपली. नागपूर येथील खाजगी रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास

86

मूल : येथील योग इंटरप्रायजेसचे संचालक, हिमालय अँग्रो चे भागीदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, प्रसिध्द धान व्यापारी तथा सेवाभावी व दानशुर व्यक्तीमत्व हिरेण (शहा) गोगरी यांच्या सुविद्य पत्नी सौ. हिना हिरेण (शहा) गोगरी, वय ४० वर्षे यांचे प्रदिर्घ आजाराने नागपूर येथील खाजगी रूग्णालयात दुःखद निधन झाले. स्व. हिना हिरेण गोगरी येथील आठ वर्षापासून कार्यरत असलेल्या फिटनेस ग्रृपच्या संचालीका होत्या. या माध्यमातून स्व. हिना गोगरी यांनी महिलांच्या आरोग्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुस्वभावी स्वभाव आणि सेवाभावी व्यक्तीमत्वामूळे त्या महिला वर्गात त्या सुपरीचित होत्या. मागील सहा महीण्यांपासुन त्यांची मृत्युशी झुंज सुरू होती. शेवटी आज दुपारी त्यांची झुंज संपली, त्यांच्या निधनामूळे शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांचे पश्चात पती, दोन मूल आणि सासुबाई यांचे शिवाय मोठा आप्तपरिवार आहे. स्व. हिना गोगरी यांचेवर उदया सकाळी ११ वाजता मूल येथे अंत्यसंस्कार करण्यांत येणार आहे. मूल टुडे परीवारा तर्फे स्व. हिना हिरेन शहा (गोगरी) यांना भावपुर्ण श्रध्दांजली, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ही प्रार्थना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here