नवभारत कन्या विद्यालयात कुष्ठरोग निर्मूलन व हत्तीरोग दुरीकरण मोहीम कार्यक्रम साजरा

73

मूल : अशिक्षितपणामुळे कृष्ठरोग्याना समाजापासून दूर ठेवल्या जात होते. कृष्ठरोग हा देवा घरचा रोग आहे, तो कधीही बरा होत नाही म्हणून कुटुंबातील लोक देखील त्या व्यक्तीच्या संपर्कात येत नव्हते, त्याला दूर ठेवल्या जात असे. कित्येक लोक यांना शिवल तर आपल्यालाही हा रोग होईल या भीतीपोटी औषधोपचारासाठी देखील रोग्याला नेत नसतं. मात्र यावर आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृतीचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून लोकांमधील गैरसमज काहीसा दूर करण्यात यश प्राप्त होत असल्याचे चित्र दिसायला लागले आहे.

त्याचाच एक उपक्रम म्हणून तालुका आरोग्य विभागाच्या वतीने दिनाक ३१ जाने. १३ फरवरी २०२३ पर्यंत कृष्ठरोग निर्मूलन,आणि १० फरवरी ते २० फरवरी २०२३ पर्यंत हत्तीरोग दुरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कृष्ट्रोग हा औषधाने पूर्ण बरा होतो हे समाजातील सर्व लोकांना कळावे याकरिता विद्यालयात विद्यार्थ्यांना मी कृष्ठरोग्यासोबत सलोख्याचे संबंध ठेवीन, इतर अजाराप्रमाने औषधाने हा आजार पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे आजाऱ्याचा तिरस्कार करणार नाही. त्याला बाहेर न ठेवता कुटूंबातील सर्व व्यक्ती सारखे मिळून मिसळून राहील. उत्तम औषधोपचार करू. अश्या प्रकारची शपथ देण्यात आली.
सदर कार्यक्रम मूल येथील आरोग्य विभागाच्या पथकाने आयोजित केला. यात वैद्याकिय सहाय्यक प्रकाश रंगारी, उमाकांत चटारे आरोग्य सहाय्यक अनिल पिपरे, सत्यनारायण भांडेकर, पुंडलिक गेडाम, सदानंद गायकवाड आदींसह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here