प्रलंबीत मागण्यांच्या पुर्ततेसाठी महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

92

मूल : मागील चार वर्षापासून प्रलंबीत असलेल्या सहा मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक कृती समितीच्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष रा.जा.बढे आणि सरचिटणीस डाॅ.आर.बी.सिंह यांच्या विनंती नुसार चंद्रपूर गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची सभा नुकतीच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे पार पडली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत रंदई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला संघटनेचे महासचिव अरूण जुनघरे, कार्याध्यक्ष लोमेश दरडे, कोषाध्यक्ष शशीकांत माडे, गजानन काळे, विनोद चोपावार, राममोहन ब्राडीया, विशाल गौरकार, हुमेश काशीवार, राजेश्वर कायरकर, चंद्रकांत खोके, रूपेश चिचोंळे, प्रशांत आगलावे, सुधाकर खरकाटे यांचेसह संघटनेचे आजी माजी पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. सभेत झालेल्या चर्चेनुसार विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक कृती समितीच्या आवाहनानुसार चंद्रपूर गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून 2 फेब्रुवारी रोजी परीक्षांचा कामकाजावर बहीष्कार टाकणार आहेत. 14 फेब्रुवारी रोजी निदर्शने, 15 फेब्रुवारी रोजी काळया फिती लावून कार्यालयीन कामकाज आणि 16 फेब्रुवारी ला एक दिवसाचा लाक्षणीक संप करण्यांत येणार आहे. या दरम्यानच्या काळात शासनाने संघटनेच्या प्रलंबीत मागण्यांच्या पुर्ततेसाठी प्रयत्न न केल्यास 20 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नीत महाविद्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर जातील. असा इशारा देण्यांत आला आहे. त्यामूळे कर्मचारी महासंघाच्या आवाहनानुसार चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपात सहभागी व्हावे. असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यांत आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here