राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे युवारंग महोत्सव संपन्न

91

सावली : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात युवारंग क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव नुकताच संपन्न झाला. महोत्सवाचे उद्घाटन नायब तहसिलदार सागर कांबळे यांचे हस्ते झाले. भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे उपाध्यक्ष अनिल स्वामी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज बोम्मावार, पत्रकार उदय गडकरी आदि उपस्थित होते. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डाॅ. अशोक खोबरागडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पत्रकार उदय गडकरी, सुरज बोम्मावार आणि नायब तहसिलदार सागर कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी युवारंग महोत्सवाचे निमित्याने सुप्त कलागुणांना प्रदर्शीत करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना मंडळाचे उपाध्यक्ष अनिल स्वामी यांनी चार भिंतीतल्या शिक्षणाशिवाय मैदानी, बौध्दीक आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या आयोजनातून विद्याथ्र्यांना व्यक्तीमत्व घडविता येते. असे मत व्यक्त केले. उदघाटन कार्यक्रमाचे संचलन डाॅ. किरण बोरकर (कापगते) यांनी तर प्रा. आशिष शेंडे यांनी आभार मानले.

चार दिवस चाललेल्या युवारंग क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवा दरम्यान आयोजीत केलेल्या विविध मैदानी, बौध्दीक व सांस्कृतिक स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून सुप्तकलागुणांना वाव दिला. महोत्सवाचा समारोप नुकताच संपन्न झाला. भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सचिव राजाबाळ संगीडवार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास गोंडवाना विद्यापीठाचे मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डाॅ. ए. चंद्रमौली, शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष डाॅ. विजय शेंडे, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डाॅ. अशोक खोबरागडे आदि उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि संस्थाध्यक्ष स्व. वामनरावजी गड्डमवार यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमा दरम्यान महाविद्यालयाचे प्रा. विजयसिंग पवार यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल संस्था सचिव राजाबाळ संगीडवार यांचे हस्ते सत्कार करण्यांत आला. डाॅ. प्रफुल वैराळे आणि डाॅ. सचिन चौधरी यांनी लिहीलेल्या वाणिज्य व विज्ञान अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यांत आले. महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पाल्य अपुर्वा सागर येलट्टीवार आणि क्रिष्णा संजय पडोळे यांनी इयत्ता बारावी मध्यें प्राविण्य मिळविल्याबद्दल मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यांत आला. महाविद्यालयातील गरीब, गरजु आणि हुशार विद्यार्थ्यांना गणवेष आणि स्पर्धा परिक्षांच्या पुस्तकाचे वितरण करण्यांत आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत वासाडे यांनी केले. डाॅ. रामचंद्र वासेकर यांनी संचलन आणि प्रा. प्रकाश घागरगुंडे यांनी आभार मानले. महोत्सवा दरम्यान आयोजीत विविध स्पर्धाच्या यशस्वीतेसाठी शारिरीक क्रिडा प्रमुख डाॅ. भास्कर सुकारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्मिता राऊत, प्रा. संदीप देशमुख, प्रा. देवीलाल वताखेरे, डाॅ. राजश्री मार्कंडेवार यांचेसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदानी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here