मूल तालुक्यात सापडला बनावट देशी दारूचा मिनी कारखाना, १६ लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त, जिल्हा दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाची प्रशंसनिय कामागिरी

61

मूल – गोट फार्मच्या जागेत प्रवरा डिस्टीलरीच्या नांवाने बनावट देशी दारू तयार करून जनतेच्या जीवीताशी खेळण्याचा गैरप्रकार आज दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या सतर्कतेमूळे उजेडात आला असुन बनावट देशी दारू तयार करण्यापासुन विक्री करण्याचे अंदाजे १६.५० लाख रूपयाचा ऐवज हस्तगत केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. दरम्यान राज्य मार्गाच्या कडेला सुरू असलेला बनावट देशी दारू कारखान्याची माहीती स्थानिक पोलीस प्रशासनाला नसावी. याविषयी शंका व्यक्त केल्या जात आहे.

मूल पासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या चितेगांव शेतशिवारात नागपूर राज्य मार्गाला लागुन असलेल्या अरूणा मरसकोल्हे यांच्या मालकीच्या ए.व्ही.जी. गोट फार्म शेळी पालन केंद्राच्या परीसरात मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू तयार करून विकल्या जाते. या गुप्त माहीतीच्या आधारे चंद्रपूर येथील दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधिक्षक संजय पाटील यांचे नेतृत्वात जवळपास पंधरा कर्मचाऱ्यांनी आज अचानक पाहणी केली. तेव्हा गोट फार्मचे फलक लागलेल्या ठिकाणी देशी दारू संबंधी काही आक्षेपार्ह साहीत्य असल्याचे दिसुन आले. म्हणुन पोलीस अधिक्षक संजय पाटील आणि सहका-यांनी फार्मच्या दोन्ही खोल्यांची कसुन पाहणी केली तेव्हा एका खोलीत बनावट देशी दारू तयार करण्याचा मिनी कारखानाच निदर्शनास आला, त्याठिकाणी पाच ते सहा प्लास्टिक ड्रम मध्ये दारू निर्मिती साठी हजारो लिटर स्पीरीट असल्याचे दिसुन आले. सिन्टेक्सच्या दोन मोठ्या टाकी पैकी एका टाकीमध्ये तयार केलेली हजारो लिटर बनावट दारू सापडली. बनावट दारू तयार करून ती बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्याकरीता लहान आणि मोठ्या प्लाँस्टीकच्या हजारो रिकाम्या शिश्या, त्यावर चिकटवण्या करीता राँकेट देशी दारू संञा लिहीलेले हजारो स्टीकर बाँक्स. प्रवरा देशी दारू प्रवरानगर जि. अहदनगर लिहीलेले खरड्याचे हजारो मोठे खोके, दारू तयार करून शिशी मध्ये भरल्यानंतर त्यांची पध्दतशिर पँकीग करण्यासाठी मोठी पँकीग मशीन, १४ मोठे निळे ड्रम, तीन खाली ड्रम, मोटार पंप, दारु तयार करण्याची मशीन, दारूला संञाचा वास येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आँरेज इसेन्स फ्लेवरच्या बाटला, अरूणा मरसकोल्हे यांचे शेकडो व्हीजीटींग कार्ड, पवन वर्मा आणि शाम मडावी यांच्या नांवाने आलेले काही पार्सल खोके, याशिवाय दारू तयार करून विक्री करण्यासाठी आवश्यक असलेले साहीत्य असे एकुण १६.५० लाख किंमतीचे साहीत्य हस्तगत केले.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी लाखो लिटर बनावट देशी दारू तयार करून जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा गैरप्रकार आढळुन आला त्याठिकाणी अरूणा मरसकोल्हे अध्यक्ष असलेल्या राणी हिराई ग्राम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर व्दारा संचालीत ए.व्ही.जी.गोट फार्म शेळी पालन केंद्र असुन केंद्राच्या तीन बाजुला २० ते २५ फुट उंचीच्या लोखंडी टिनेची भिंत टाकली आहे. बेकायदेशीर दारू कारखान्याची माहीती होऊ नये म्हणुन कदाचित परिसरात कोड्यांची शेकडो पोते ठेवल्याचे दिसुन आले. लागुनच असलेल्या टिनेच्या शेडमध्ये राजश्री शाहु महाराज बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सुरू असुन चितेगांव येथील बोटावर मोजण्या इतके कां होईना विद्यार्थी अधुन मधुन शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे संबंधित व्यक्ती गोट फार्मच्या ठिकाणी राज्य मार्गाला लागुनच बनावट देशी दारूचा मिनी कारखाना राजरोसपणे चालवित असावा. हे जरी खरं असलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात राजरोसपणे जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार चालावा. यावरून सदर गैर व्यवसायात नक्कीच दारूचा व्यवसाय करणारी मोठी आणि राजकीय मंडळी गुंतली असावी. अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यात दारूबंदी असतांना दारूचा अवैद्य व्यवसाय करणारी मंडळी बाजुच्या जिल्हा आणि राज्यामधुन दारूची आयात करून कधी पोलीसांच्या डोळ्यात धुळ झोकुन तर कधी पोलीसांना सांगुन राजरोसपणे दारूचा व्यवसाय करीत होते परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट दारू तयार करून विकण्याचा प्रकार घडला नव्हता परंतु दारूबंदी उठल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंञी नेतृत्व करीत असलेल्या विधानसभा क्षेञात आणि उपमुख्यमंञी तथा गृहमंञ्याचे मूळ गांव असलेल्या शहरा लगत राज्य मार्गावर बनावट देशी दारू निर्मितीचा मिनी कारखाना प्रशासनाच्या हाती लागावा. याविषयी आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. शोध लागलेल्या बनावट देशी दारू कारखान्याची दारूबंदी उत्पादन शुल्क विभागासह जिल्हा पोलीस प्रशासनाने नोंद घेतली आहे. स्पीरीट वापरण्यास सर्वसामान्य नागरीकास मज्जाव असतांना हजारो लिटर स्पीरीट ची आयात करून त्याचा सर्रासपणे बनावट दारू निर्मिती साठी वापर व्हावा. ही बाब आश्चर्यकारक असुन स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामूळे बनावट दारूचा व्यवसाय करून जनतेच्या जीवीताशी खेळण्याचा प्रकार करणाऱ्या विरूध्द कडक कारवाई करावी. अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.

ज्या गोट फार्मच्या ठिकाणी बनावट देशी दारू निर्मितीचा अवैद्य मिनी कारखाना उजेडात आला, त्या गोट फार्म शेळी पालन केंद्रास नोव्हेंबर २०१७ मध्ये राज्याचे तत्कालीन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंञी महादेव जानकर यांचेसह तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी भेट देवुन संस्थाचालकांचे कौतुक केले होते, हे विशेष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here