राजोली येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमीत्त रक्तदान शिबीर संपन्न

83

राजोली – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा दोन दिवसीय पुण्यतिथी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. सकाळी ध्यान व त्यानंतर ग्राम स्वच्छता केली. ९ वाजता जेष्ठ गुरुदेव उपासक सुधाकरजी चिंतावार यांच्या शुभ हस्ते घटस्थापना, झेंडावंदन करीत कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.डाँ.बोरकर, जितेंद्रजी लोणारे सरपंच राजोली, आनंदराव ठिकरे, गजानन ठिकरे, धारणे महाराज, लाकडे महाराज यांनी मार्गदर्शन करत राष्ट्रसंताच्या जीवनावर प्रकाश टाकला. महिला, पुरुषांच्या भजनांनी कार्यक्रमाला रंगत आली. लहान मुलांचे ग्रामगीता ओवी वाचन स्पर्धा घेण्यात आली, कु. वैष्णवी अतकरे यांचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले. ०५ फरवरीला गावातून रामधून काढण्यात आली. राष्ट्रप्रती सेवा अर्पण करण्याहेतू ११.३० वाजता भव्य रक्तदान शिबीरांमध्ये ४८ युवक, महिलांनी सहभाग घेतला. गोपालकाला किर्तन ह.भ.प. बावणे महाराज यांनी केले. ४.५८ ला राष्ट्रसंतांना मौन श्रध्दांजली वाहण्यात आली.सायं ६.३० वाजता महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अ.भा.श्री गुरूदेव सेवा मंडळ शाखा राजोली चे अध्यक्ष आनंदराव ठिकरे,विलास सुचक, सुधाकरजी चिंतावार,केवळराम लाकडे, श्रीधर पाखमोडे,सचिन गेडाम,रामदास लाकडे, ईश्वर सोनवाणे, गोंविदा ठिकरे, गोपाल ठिकरे, डिकेश ठिकरे, अमित ठिकरे, प्रमोद ठिकरे,रोहित रायपुरे, आणि संपुर्ण गुरूदेव भक्तांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here