तालुक्यातील सात पैकी चार ग्रा.पं. काँग्रेस प्रणीत आघाडी तर दोन ग्रा.पं.वर भाजपा आघाडीचे सरपंच, गडीसुर्ला येथे ग्राम विकास आघाडीची सरपंच विजयी

140

मूल : तालुक्यातील सात ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काॅंग्रेसने चार तर भाजपाला दोन ग्राम पंचायती काबीज करता आल्या. गडीसुर्ला ग्राम पंचायतीवर ग्राम विकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले. तालुक्यातील सर्वात मोठी आणि संवेदनशिल म्हणून ओडखल्या जाणा-या बेंबाळ ग्राम पंचायतीवर काॅंग्रेस व बौध्द समाज समर्थीत परिवर्तन आघाडीचे चांगदेव काशीनाथ केमेकार यांनी भाजपा समर्थीत विकास पुरूष ग्राम विकास आघाडीचे मुन्ना कोटगले यांचा २७७ मताने पराभव करत सरपंच पदी विजयी झाले. आकापुर ग्राम पंचायतीवर काॅंग्रेस प्रणीत गोंडवाना आदिवासी आघाडीने एक हाती सत्ता प्रस्थापीत केली. आकापुर येथे काॅग्रेस प्रणीत आघाडीचे भास्कर हजारे सरपंच पदी विजयी झाले. बाबराळा ग्राम पंचायतीवर काॅंग्रेस प्रणीत आघाडीचे धिरज गोहणे तर चक दुगाळा ग्राम पंचायतीवर काॅंग्रेस बौध्द विकास आघाडीच्या प्रिती भांडेकर सरपंच पदी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात निर्माण झालेल्या काॅंग्रेस प्रणीत आघाडीने सात पैकी चार ग्राम पंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. भाजपाने बोंडाळा आणि उश्राळा हया दोन ग्राम पंचायती वर विजय मिळविला. बोंडाळा येथे भाजपाच्या सोनम बांगरे तर उश्राळा येथे भाजपा प्रणीत आघाडीच्या प्रियंका नमरलवार सरपंच पदी विजयी झाल्या. गडीसुर्ला ग्राम पंचायतीमध्यें ग्राम विकास आघाडीच्या शारदा येनुरकर सरपंच पदी विजयी झाल्या. गडीसुर्ला ग्राम पंचायतीमध्यें ग्राम विकास आघाडीचे सहा तर नवयुवक आघाडीचे तीन सदस्य विजयी झाले. पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत तालुक्यातील सात ग्राम पंचायती पैकी बेंबाळ आणि आकापुर ग्राम पंचायतीची निवडणुक अधीक चर्चेची ठरली. पंचायत समितीचे माजी सभापती चंदु मारगोनवार यांना त्यांचे स्वगांव असलेल्या बेंबाळ येथे भाजपाला तर खा. बाळु धानोरकर यांनी प्रचारात सहभाग घेतलेल्या उश्राळा ग्राम पंचायतीवर काँग्रेसला पराभव स्विकारावा लागला. हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here