मूल : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील वाणिज्य विभागाचे सहाय्यक प्राध्यापक विजयसिंग भोमसिंग पवार यांना विद्यापीठाने नुकतेच आचार्य पदवीने सन्मानित केले. २०१० ते २०१६ या कालखंडातील जळगांव जिल्ह्यातील बंजारा जातीच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचे तुलनात्मक अध्ययन या व्यावसायीक वाणिज्य विषयावर प्रा. विजयसिंग पवार यांनी गोंडवाना विद्यापीठाची आचार्य पदवी प्राप्त केली असुन यासाठी शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथील सहयोगी प्राध्यापक डाँ. प्रदीप घोरपडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. गोंडवाना विद्यापीठाने आचार्य पदवीने सन्मानित केल्याबद्दल महाविद्यालयातील कर्मचारी वृंदानी डाँ. पवार यांचे अभिनंदन केले आहे. पदवी प्राप्त करण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन केल्याबद्दल डाँ. विजयसिंग पवार यांनी संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार, सचिव राजाबाळ संगीडवार, मार्गदर्शक डाँ. प्रदीप घोरपडे आदिंचे आभार मानले आहे.