मूल – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या आणि बाहेर असलेल्या तालुक्यातील अनेक गावांत वाघांचा हैदोस वाढला असून एका वर्षाच्या काळात सतरा व्यक्ती आणि तीसच्या वर पाळीव जनावरांचा बळी गेला आहे. जंगलात दिवसेंदिवस वाघांचे प्रमाण वाढत असुन जंगल सोडुन गांवाजवळ येवु लागल्याने वाघांचे मानवावर हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामूळे जंगला लगत राहणाऱ्या नागरीकांना दहशतीमध्ये जीवन जगावे लागत आहे. अशी विदाराक परिस्थिती निर्माण झाली असतांना जिल्ह्याचे पालकमंञी असलेल्या राज्याच्या वनमंञ्यांना माञ जनतेची काळजी नसल्याचा आरोप केल्या जात आहे. भात शेतीचा तालुका असलेल्या मूल तालुक्यात अलीकडे कपाशी आणि भाजीपाल्याचीही लागवड केल्या जात असुन शेकडो शेतकऱ्यांची शेती ही जंगलाला लागून असुन शेतीशिवाय उत्पन्नाचा दुसरा पर्याय नाही. त्यामुळे परीसरात वाघाची दहशत असली तरी कुटूंबाच्या उदरनिर्वाहाकरीता त्यांना जीवा मुठीत घेवुन शेतात ये जा करावे लागत आहे. अश्या भयवाह परिस्थितीत जंगलातील वाघ अन्न आणि पाण्याच्या शोधात गांवाकडे येवु लागल्याने वाघाच्या हल्यात बळी जाण्याचा घटना दिवसागणीक वाढत आहे. त्यामुळे हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करण्यासोबतच नागरीकांना सुरक्षितता द्यावी. अशी मागणी जिल्ह्याच्या अनेक भागातुन होत आहे. असे असतांना माञ वनविभाग जनतेमध्ये निर्माण झालेला संताप शमविण्यासाठी वाघाचा बंदोबस्त करण्याकडे थातुर माथुर प्रयत्न करीत आहे. वनविभागाची ही कृती जनभावनेशी खेळणारी असल्याने हल्लेखोर वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा जनतेच्या हितासाठी तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प. चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने निवेदनाव्दारे देण्यात आला. वनपरीक्षेञ अधिकारी यांचे मार्फतीने पाठविलेल्या निवेदनामध्ये वाघाच्या बंदोबस्तासाठी जंगलासभोवताल संरक्षण भिंत किंवा तारेच्या जाळीचे कुंपण उभारावे. जंगला भोवती सौर दिवे लावावे, जंगला लगतच्या गावात वनविभागाने गस्त चौकी उभारावी, वाघाने ठार केलेल्या कुटुंबीयांना मृत झाल्याच्या दिवशीच १० लाखाची रोख मदत देण्यात यावी, वाघाने ठार केलेल्या कुटुंबियातील एका व्यक्तीला वनविभागात नोकरी द्यावी, शेकऱ्यांची पाळीव जनावर चारण्यासाठी वनविभागाने जागा आरक्षित करून द्यावी, शेतात उभे असलेले खरीपाचे पीक घेण्यासाठी वनविभागाने संरक्षण द्यावे. आदी मागण्यांचा निवेदनात समावेश असून सदर मागण्यांच्या पुर्ततेसंबंधी तातडीने कार्यवाही करावी अन्यथा जनतेच्या हितासाठी कायदा हातात घेऊन तिव्र आंदोलन करू. असा इशारा दिला आहे. निवेदन देतांना संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष राकेश रत्नावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरु गुरनुले, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, ग्रामीण काँग्रेस नेते दीपक वाढई, प्रशांत उराडे, सुरेश फुलझेले, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, बाजार समितीचे माजी संचालक शांताराम कामडे,आदर्श खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, सरपंच रवींद्र कामडी, विलास दवणपल्लीवार, विक्रम गुरनुले, कैलाश चलाख, जी.के.जीवने, गणेश कोडापे, देवानंद मशाखेत्री, गणेश रणदिवे, रत्नाकर अलोने, आकुलवार आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.