कार्यकर्त्यांच्या गर्दीने काकुंचा वाडा पुन्हा फुलू लागला

100

मूल : राजकारणातील उलथापालथ आणि कौटुंबिक कारणांमूळे राजकिय क्षेत्रात थोडया अंतरावर गेलेल्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस अलीकडे सक्रिय झाल्या असून मागील महिण्याभरापासून बैठकांच्या धडाका लावला आहे. त्यामूळे कार्यकर्ते आणि नागरीकांच्या गर्दीने एकेकाळी फुलून राहणारा स्थानिक गुजरी चौकातील वाडा पुन्हा गर्दीने गजबजु लागला आहे. त्यामूळे तळयात मळयात खेळणा-या मंडळीची येत्या काळात गोची होते की काय ? अशी तालुक्यात चर्चा आहे.
ग्राम पंचायत पासुन राज्याच्या मंत्रालया पर्यंत आपला कार्याचा ठसा उमठवणा-या माजी मंत्री शोभाताई फडणवीस उपाख्य काकु जिल्हयाच्याच नव्हे तर राज्याच्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. व्यक्तीमत्वासोबतचं विविध विषयावरचा त्यांचा दांडगा अभ्यास, लिखानाची पध्दत, जनसंपर्क व अधिका-यांशी असलेला संवाद आणि परिचयामूळे त्याकाळी जिल्हयाच्या राजकारणात शोभाताईंचा दबदबा होता. त्यांच्या याच व्यक्तीमत्वामूळे कार्यकर्त्यांनी त्यांना तेजस्विनी अशी उपमा दिली. तेजस्विनी शब्दाला साजेल अशी त्यांची राजकिय क्षेत्रासोबतचं विविध क्षेत्रात घौडदौड सुरू असतांना झालेल्या विधानसभा क्षेत्राच्या फाळणीत काकु माघारल्या. वर्षानुवर्षे ज्या विधानसभा क्षेत्राचे काकुंनी नेतृत्व केले त्या जुन्या सावली विधानसभा क्षेत्रात समाविष्ठ असलेला सावली तालुका ब्रम्हपूरी तर उर्वरीत भाग बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात समाविष्ठ झाल्याने दोन्ही भाऊंना संधी देण्यासाठी काकुंनी माघार घेतली आणि तिच काकुंची चुक झाली. अशी काकु समर्थकांमध्यें त्यावेळी चर्चा होती. परंतु ज्येष्ठ नेत्या म्हणून मनाचा मोठेपणा दाखवत निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर काकुंना विधान परिषदेची संधी देण्यांत आली. परंतू घडलेल्या राजकिय घडामोळीत काकुंना आमदार राहुनही त्यांना स्वकीयांनीच लोकसंपर्कापासून दूर ठेवण्याची भुमीका स्विकारली. मंत्री पदाच्या कार्यकाळात अवती भोवती घुटमळणारी कार्यकर्त्याची फळी स्वार्थी राजकारणात काकु पासून अंतर ठेवून वागु लागली. अश्याही परिस्थितीत मोजक्या निष्ठावंताच्या सोबतीने काकुची कार्यप्रणाली निरंतर सुरूच होती परंतु भाऊच्या झंझावातात काकु राजकिय पटलावर मागे पडल्या. दरम्यान घडलेल्या कौटुंबिक घटना आणि प्रकृतीमूळे काकु काही महिणे अस्वस्थ होत्या. परंतू धडपड आणि सेवेचा पिंड असलेल्या काकु फार काळ अस्वस्थ राहू शकल्या नाही. पाठीशी मोजके निष्ठावंत असले तरी जीवाला जीव देणारे असल्याने वाढत्या वयातही काकुंचा राजकारणातला उत्साह कमी झाला नाही. निष्ठावंत आणि विश्वासु जनतेसाठी कार्यरत राहीलेल्या काकु मागील महिण्याभरापासून अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. तालुक्यातील महत्वाच्या आणि सामाजीक समस्या घेवून काकुंनी अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, प्रवेशापासून वंचित असलेल्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना मिळवून दिलेली प्रवेशाची संधी, छोटेखानी घेतलेला पण मोठा झालेला कार्यकर्त्यांचा मेळावा याशिवाय काही महत्वाच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी सुरू असलेला काकुंचा सातत्याचा पाठपुरावा यामूळे काकुंचा वाडा अलीकडे पुन्हा गर्दीने फुलु लागला आहे. त्यामूळे साथ सोडून गेलेले काही कार्यकर्ते राजकिय उलथा पालथीमध्यें पुन्हा काकुंकडे परतु लागले असून शासकिय कार्यालयातही काकुंचा दबदबा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामूळे भविष्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काकु अधिक सक्रिय होण्याची शक्यता भाजपा वर्तुळात वर्तविल्या जात आहे. मागील काही महीण्यांपासुन भाऊंनीही तालुक्यातील एकाही गांवाला भेट दिली नसल्याने स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पुर्वीचा उत्साह नसल्याचे दिसत आहे. परंतु अलीकडे काकु सक्रिय झाल्याचे दिसत असल्याने भाजपा वर्तुळात काहीशी अस्वस्थता दिसुन येत असुन साथ आणि हात सोडून गेलेल्या एकेकाळच्या निष्ठावंताची काकुंच्या सक्रीयतेमूळे येत्या काळात गोची होईल. असे बोलल्या जात असुन तळ्यात मळ्यात खेळणारी काही मंडळी तळा आणि मळ्याच्या बांधावर उभे असल्याचे दिसुन येत आहे. त्यामूळे येणाऱ्या काळात तालुक्यातील राजकारणात अनेक स्थित्यंतरे बघायला नक्कीच मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here