शाळकरी मुलीस ट्रकची धडक

88

शाळकरी मुलीस ट्रकची धडक
गंभीर जखमी,ट्रक चालकास अटक
मूल :- विज्ञान प्रयोगाचे साहित्य घेवून सायकलने रस्ता ओलांडणा-या एका शाळकरी मुलीस सिमेंटने भरलेल्या ट्रकने धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास येथील मॉ दुर्गा माता मंदिराच्या समोर घडली.याप्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून जखमी मुलीस चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.जखमी मुलीचे नाव दिव्या पांडूरंग ठाकरे वय 14 वर्षे,रा.चिचोली असे आहे.ती येथील बाल विकास शाळेची वर्ग 8 वीची विदयार्थीनी आहे. मूल येथील बाल विकास शाळेत विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.त्यासाठी दिव्या पांडूरंग ठाकरे ही मुलगी सायकलने आपल्या चिचोली या गावावरून नातेवाईकासोबत मूलला आली होती.मुलींचा एक गट विज्ञान प्रयोग बनविणार होते.त्यासाठी मयूरी नामक वर्ग मैत्रीणीच्या घरून तीन चार मूली प्रयोगासाठी लागणारे काही इलेक्ट्रिकचे सामान आणण्यासाठी दुकानात गेल्या होत्या.ते सामान घेवून येत असताना दिव्याच्या सायकलला चंद्रपूर मार्गाने ब्रम्हपूरीकडे सिमेंट घेवून जाणा-या एम एच 34, बी झेड 1161 या क्रमांकाच्या ट्रकची धडक बसली.त्यात ती गंभीर जखमी झाली.तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून पायाला सुदधा मार बसला आहे.मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून तीला चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी ट्रक चालक मुकेश विलास सोयाम रा.बाबूपेठ चंद्रपूर याच्या विरूदध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद पांडूरंग ठाकरे यांनी मूल पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. पुढील तपास मूल पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here