मूल – मूल शहरात भुरट्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून तहसील कार्यालय परिसरात अनेक दुकान फोडून रोख रक्कम लंपास केल्याने शहरवासीय चांगलेच भयभित झाले आहेत.
तहसिल कार्यालय परीसरात अनेक किरकोळ व्यावसायीक व्यवसाय करून कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालवित आहे. ऑनलाईन जाॅब वर्क आणि झेराॅक्सचे बहुतांश दुकानं असुन गरीब बेरोजगार तरूणांचे जगण्याचे आधार आहे. मागील आठवड्यात भुरट्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला. येथील अनेक दुकानांचे कुलुप तोडून त्यातील नगदी रोख रक्कम लंपास केली. तहसील कार्यालया समोरील जीके मोबाईल, पत्रकार भवना शेजारील एलआयसी प्रीमियम पाॅईंट, तुकाराम चाय टपरी यांचे कुलपं तोडुन त्यातील रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान अंधाराची संधी साधुन घरासमोरील दुचाकी मधील पेट्रोलही चोरी होऊ लागले असुन कुलुप बंद घराचे कुलुपही तोडुन पाहण्याच्या अनेक घटना शहराच्या काही भागात घडत असल्याने शहरवासीयांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यामूळे मूल शहरात पोलीसांची गस्त वाढवावी. अशी मागणी होत आहे.