मणुष्य जीवनात योग नृत्य महत्वाचे-संतोषसिंह रावत

112

मूल : पर्यावरणा सोबतचं सुदृढ शरीर आणि निरोगी आरोग्यासाठी व्यायाम आणि योगा मणुष्य जीवनात महत्वाचे झाले आहे. विविध आजाराने ग्रस्त असलेले शेकडो जण आजारातून मुक्त होण्यासाठी अलीकडे योग नृत्याकडे वळत असून योगामूळे अनेकांना लाभ झाल्याची वास्तविकता आहे. असे मत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तथा श्री माँ दुर्गा मंदीर सेवा समितीचे अध्यापन संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.
श्री माॅ दुर्गा मंदिर सेवा समिती मूलच्या वतीने योगा नृत्य परिवार चंद्रपूरच्या सहकार्याने स्थानिक दुर्गा मंदिर येथे आयोजीत योग नृत्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. योगा नृत्य परीवारचे संस्थापक गोपालजी मुदंडा यांचे हस्ते श्री माॅ दुर्गा देवीचे पुजन आणि दिप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी योग नृत्य परिवार चंद्रपूरचे संस्थापक गोपाल मुदंडा, सावली येथील प्रकाश खजांची, किशोरी हिरूडकर, राकेश रत्नावार, डाॅ. विजय शेंडे, सुरेश देशमुख आदि उपस्थित होते. सकाळी ६ वाजतापासून सुरू झालेल्या प्रशिक्षण शिबिरात आकाश घोडमारे, विशाल गुप्ता, सुरज घोडमारे, कविता मिर्धा, सुरेश घोळके, अल्का गुप्ता, रविंद्र निखारे, संजय पडशीलवार, क्रिष्णा कुराला, बाळकृष्ण माणुसमारे, रंजना मोडक आदिंनी उपस्थित शिबिरार्थ्यांना विविध योग नृत्याचे प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे संचालन मंदिर समितीचे सचिव संजय पडोळे यांनी केले. यावेळी चंद्रपूर आणि सावलीसह मूल शहरातील शेकडो आबाल स्त्री पुरूष आणि युवा वर्ग सहभागी झाले असून सदर योग नृत्य प्रशिक्षण शिबिर निरंतर सुरू राहणार असल्याने शहरातील योगा प्रिय मंडळींनी समाधान व्यक्त केले आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी गुरू गुरनूले, सुनिल मंगर, संदीप मोहबे, विवेक मुत्यलवार, केदारनाथ कोटगले, मुकेश महाराज आदिंनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here