मूल- आधुनिक भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्य तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने स्थानिक काँग्रेस भवनात त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष, काँग्रेस नेते संतोषसिंह रावत आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी प्राचार्य नत्थुपाटील आरेकर यांचे हस्ते स्व. इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही स्व. इंदीराजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहुन अभिवादन केले. यावेळी काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांनी गांधी घराण्यांनी केवळ भारतीयांच्या कल्याणासाठी बलिदान दिले असुन काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांनी नं भूतो नं भविष्यती अशी भारत जोडो यात्रा काढून मतभेद जोडण्याचे काम करीत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद काँग्रेसच्या मजबुतीसाठी लाभदायक ठारणार आहे. त्यामूळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मजबुतीसाठी एकसंघ राहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी मूल तालुका काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनूरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष माजी न.प. उपाध्यक्ष राकेश रत्नावार, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संदीप कारमवार, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक राजेंद्र कन्नमवार, सेवा सहकारी सोसायटी केळझर येथील अध्यक्ष किशोर घडसे, राजू पाटील मारकवार, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी प्राचार्य बंडूजी गुरनुले, संचालक विवेक मुत्यलवार, डॉ.पद्माकर लेनंगुरे, सरपंच राहुल मुरकुटे, शहर कांग्रेस सरचिटणीस सुरेश फुलझेले, उपाध्यक्ष संदीप मोहबे ,कैलाश चलाख, संतोष चावरे, अन्वर शेख, विष्णू सादमवार यांचेसह ग्रामीण व शहरातील काँग्रेस कार्यकर्ते सरपंच, उपसरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार तालुका अध्यक्ष गुरुदास गुरनुले यांनी मानले..