अरे बापरे ! चांदापूरच्या शेतात पकडला भल्ला मोठा तेरा फुटी अजगर

108

चांदापूरच्या शेतात पकडला भल्ला मोठा तेरा फुटी अजगर

मूल :- तालुक्यातील चांदापूरच्या शेतात एका भल्ला मोठया तेरा फुटी अजगरला शुक्र्रवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान पकडण्यात आले. आत्तापर्यंत सापडलेला हा सर्वांत मोठा अजगर असल्याची माहिती आहे.यावर्षी मूल तालुक्यातून वीस अजगर पकडल्याची नोंद आहे.मूल तालुक्यातील चांदापूर येथे बंडू कडूकर यांच्या शेतात धान कापणी सुरू आहे. धान कापणी करताना मजूरांना दुपारी एक वाजताच्या दरम्यान भल्ला मोठा साप असल्याची जाणीव झाली.त्यांनी काम बंद करून याची माहिती दिलीप पाल यांना दिली.त्यांनी मूल येथिल सर्पमित्र तन्मय झिरे यांना माहिती दिली.तन्मय झिरे आणि वेदांत निकूरे या दोघांनी तात्काळ चांदापूर गाठून धानात लपून बसलेल्या अजगराला मोठया शिताफीने पकडले.तेरा फुट लांबीचा अजगर पकडताना दोघांना मोठी कसरत करावी लागली.हा अजगर वैनगंगा नदीकाठाने शेतात ठाण मांडून असावा असा अंदाज आहे. तालुक्यातील चांदापूर हे गाव पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असल्याने येथील क्षेत्रसहायक विनोद कस्तूरे यांच्या उपस्थितीत तेरा फुटी अजगराला मूलच्या जंगलात निसर्गमुक्त करण्यात येणार आहे. येथील वन्यजीव अभ्यासक उमेशसिंह झिरे यांनी आत्तापर्यत आठ ते बारा फुटापर्यंत अजगर पकडले होते.परंतु तेरा फुटी अजगर तालुक्यात प्रथमच सापडला आहे.यावर्षी मोठया प्रमाणात वैनंगगा नदीला पुराचा विळखा होता.धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. महापुरामुळे अजगर शेता पर्यंत आले.त्यामुळे यावर्षी वीस अजगर पकडल्याची माहिती उमेशसिंह झिरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here