राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी – संतोषसिंह रावत यांची मागणी, कर्मचारी संघटनेकडून रावत यांचे आभार

110

मूल (प्रतिनिधी)  २००५ पासून शासन सेवेत रुजू झालेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंञी आणि अर्थमंञी यांना पाठविलेल्या निवेदनात संतोषसिंह रावत यांनी २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू झाली आहे. नवीन पेन्शन योजनेमध्ये अनेक दोष असल्याने राज्य कर्मचाऱ्यांकडून या योजनेचा सुरुवाती पासूनच विरोध केला जात आहे. राज्य कर्मचारी नवीन पेन्शन योजना बरखास्त करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना शासनाकडे वारंवार मागणी करीत आहेत. याबाबत राज्य कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी शासनाकडे निवेदने दिली जात असून पाठपुरावा केला जात आहे. मात्र अद्याप राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली नसल्याने संतोषसिंह रावत यांनी खंत व्यक्त केली. पंजाब राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना मान सरकारने नुकतीच जुनी पेन्शन योजना लागु केली. त्यामूळे आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना देखील शिंदे सरकार जुनी पेन्शन योजना लागू करेल. अशी अपेक्षा असल्याचे मतही रावत यांनी व्यक्त केले. राज्य कर्मचाऱ्यांना जुन्या पेंशन योजना लागु करावी. या न्याय मागणीसाठी लोकसेवक म्हणुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी शासनकर्त्यांसोबतच विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही निवेदनाव्दारे विनंती केल्याने जुन्या पेंशन योजनेसाठी लढा देत असलेल्या कर्मचाऱ्यांनी संतोषसिंह रावत यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here