*दिवाळीची चंगळमंगळ*
दिवाळी म्हणजे आनंदाच्या पलिकडचा सण.दिवाळी म्हणजे फराळांची चंगळमंगळ.चवी चवीच्या पदार्थांची चव. दिवाळी म्हणजे आप्तेष्टांच्या आपूलकीचा,बहिण भावाच्या नात्यांचा आणि उटणेच्या सुगंधाचा सण. दिवाळी म्हणजे आनंदाला पारावर नाही.दिवाळीचे पाच दिवस भुरर्कंन निघुन जात असले तरी,त्याच्या आगमनाच्या आठवणीनेच मनात आनंदाचे भरते तयार होते.तो आनंद गगनात मावेनाशा होतो.सुख दुःखाच्या राशी पणत्यांच्या प्रकाशातून तेवत असतात.या तेजोमय झालेल्या पणत्या सदैव आपल्याला उर्जा देत असतात.जणू काही त्या पणत्या म्हणतात,आता प्रकाशाकडे चला.अंधार बाजूला सारा.नव्या उभारीने कामाला लागा. स्वतःला उजळा आणि दुस-यांनाही उजाळा. मनातील अंधार दूर करा. सकारात्मकतेचे पाऊल टाका.विविध संदेशांचा दिवाळी सण राष्टीय एकात्मता टिकवून ठेवतो,हे विशेष. दिवाळीच्या फराळाची चंगळमंगळ दिवसातून कितीदा तरी होत असते.शिजलेला स्वयंपाक बाजूला पण फराळाची प्लेट हातात आली की काही विचारायलाचा नको. खाऊन खाऊन पोट तृप्त झाले की वाटत,े बस्स.. आता नको. चविष्ट पदार्थाची चव जिभेवर सदैव रेंगाळत असते. असा हा सण. पुढच्या वर्षी कोणत्या महिण्यात येणार याची मोठी उत्सुकता लागून असते. मनाला उर्जा देणारा दिवाळी सण. हा दिवाळी सण प्रत्येकाच्या घरात आनंदाने, सुख शांती समाधानाने आणि आपूलकीने साजरा व्हावा. ऐवढी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. अन्नदाता शेतकरी,शेतमजूर,गोरगरिब अशा सर्व प्रत्येकाच्या घरात प्रकाशाचे,आनंदाचे पर्व निर्माण व्हावे आणि झोपडीतील अंधार दूर व्हावा.
एक दिवा प्रकाशाचा
एक दिवा आनंदाचा
एक दिवा राष्टीय एकात्मतेचा
एक दिवा दिवाळी सणाचा.
ही दिवाळी आपल्या सर्वांना सुख,शांती,समाधान, समृदधीची भरभरून जावो ही सदिच्छा.
श्री.विनायक रेकलवार,मूल
8975140998