मूल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार ३ ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर राज्यात जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. त्याच धरतीवर विधान सभेचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांचे मार्गदर्शनात उद्या पासुन मूल तालुक्यात जनसंवाद पदयाञा काढण्यात येणार आहे. मूल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पदयात्रेचा शुभारंभ काँग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काढण्यात येणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मूल येथील नाग विदर्भ चरखासंघा मधुन उद्या सकाळी ६ वाजता निघणार आहे, पदयात्रेच्या माध्यमातून मुल तालुक्यातील जनतेमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध जनजागृती करण्याचा काँग्रेसचा संकल्प असून महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अन्याय, अत्याचार व दुष्काळ, लोकशाहीची हत्या अशा अन्य समस्यांवर प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधून काँग्रेसजन जनभावना जाणुन घेणार आहे. काढण्यात येणारी पदयात्रा तालुक्यातील सर्व गावांना भेट देणार असुन जनतेशी संवाद साधणार आहेत. तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व महीला, पुरूष आणि युवक कार्यकर्त्यांनी आयोजित पदयाञेत सहभागी व्हावे. असे आवाहन काँग्रेस पदाधिका-यांनी केले आहे.