मूल : मणिपुर येथील दोन महिलांवर अत्याचार करून त्यांना विवस्ञ करून फिरवण्यात आले आणि दोन पुरूषांना जीवे मारण्यात आले. या घटनेचा स्थानिक गांधी चौकात मूल तालुका काँग्रेस पार्टी, मूल, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उध्दव ठाकरे शिवसेना गट, महीला काँग्रेस ” आणि रिपाईच्या वतीने निदर्शने करत निषेध करण्यात आला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात करण्यात आलेल्या निदर्शनात तालुक्यातील चारही पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळेस बोलतांना चारही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मणिपुर येथील घटनेसह इतर पक्षाच्या नेत्यांवर निराधार आरोप करून शासन यंञणेचा दुरूपयोग करून नाहक बदनामी करणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची अश्लील चिञफित समोर आली असुन कारवाई करीता शासनकर्त्यांना सादर केली आहे. असे असताना राज्यातील ञिकुट सरकार किरीट सोमय्या विरूध्द अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही न करता अभय दिल्या जात आहे. ह्या दोन्ही घटना अत्यंत निदंनिय असल्याने देशात संताप व्यक्त केल्या जात आहे. असे असताना विकास आणि प्रगतीचे भाषण देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेवर भाष्य न करता मुंग गिळुन गप्प आहेत. मागील तीन महीण्यापासुन भाजपाची सत्ता असलेल्या मणिपुर मध्ये दंगली भडकत आहेत. तेथील नागारीकांना जीव मुठीत ठेवुन जीवन जगावे लागत आहे, असे असताना देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता असताना दोन्ही सरकार मणिपुर वासियांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी संरक्षण, सुरक्षित आणि सहकार्य करू शकत नाही. ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे. राज्य आणि देशातील जनतेला सुरक्षिततेचे जीवन जगण्यास आश्वस्त करू शकत नसेल तर त्या सरकारने त्वरीत सत्तेची खुर्ची सोडली पाहीजे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा. किसन वासाडे, रिपाईचे दिलीप गेडाम, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रशांत गट्टुवार, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार, फरजाना शेख, निवृत्त मुख्याध्यापक बंडु गुरनुले, बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी साभापती घनश्याम येनुरकर, तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले आदींनी केले. यावेळी बोलतांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मणिपुर आणि सोमय्या प्रकरण घृणास्पद असुन येत्या काळात जनतेनी भाजपाला माफ करू नये. असे आवाहण केले. शहरअध्य सुनिल शेरकी यांनी संचलन केले. यावेळी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अखील गांगरेड्डीवार, संदीप कारमवार, हसन वाढई, किशोर घडसे, राजु मारकवार, हेमंत सुपनार, प्रभाकर धोटे, डाँ. पदमाकर लेनगुरे, पवन निलमवार, विजय बोम्मावार, राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्या अर्चना चावरे, महीला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष नलीनी आडेपवार, माजी नगरसेवक विनोद कामडे, कैलास चलाख, शामला बेलसरे, वैशाली काळे, सरपंच रविंद्र कामडी, प्रशांत भरतकर, व्यंकटेश पुल्लकवार, विवेक मुत्यलवार, संदीप मोहबे, विष्णु सादमवार, दुष्यंत महाडोळे, आदी उपस्थित होते.