महिलेच्या तक्रारीवरून अग्रवाल पितापुञाविरूध्द गुन्हा दाखल, प्रकरण दडपण्यासाठी अग्रवाल यांचे राजकीय नेत्यांना साकडे

119

मूल : रस्त्यावर वाहन उभे ठेवुन रस्ता अडवुन वाद उकरून काढत मारहाण केल्याने येथील व्यापारी पितापुञावर गुन्हा दाखल झाल्याची घटना नुकतीच शहरात घडली.

स्थानिक चंद्रपूर मार्गालगतच्या वार्ड नं. १५ येथील स्वाती हरीश गोविंदवार यांच्या तक्रारीवरून मूल पोलीसांनी मनोज अग्रवाल आणि शुभम अग्रवाल यांचे विरूध्द भादवी ३५४, ५०९, २९४, ३२३, ५०६, ३४ आणि आनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याने अग्रवाल पितापुञ चांगलेच अडचणीत सापडले आहे. पोलीसात नोंदविलेल्या तक्रारीनुसार घरासमोर असलेल्या शासनाच्या मोकळ्या जागेत लहान मुल खेळतात. सदर जागा मोकळी असल्याने पुर्वी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात डुकरांचा वावर होता, त्यामुळे त्याजागेवर घाणीचे साम्राज्य पसरून दुर्गंधी पसरत होती. परीणामी त्या दुर्गंधीमूळे आरोग्यावर विपरीत परीणाम पडू नये, सदर ठिकाणी साप विंचु सारख्या जीवघेण्या प्राण्यांचा वावर राहु नये म्हणुन सदर जागा स्वच्छ करून त्या जागेवर आम्ही तारेचे कुंपण केले. तेव्हापासुन मनोज अग्रवाल आमच्याशी सदर जागा तुम्ही कसे काय वापरता म्हणत वारंवार शाब्दीक वाद करत असतात. येण्या जाण्याचा मार्गावर वाहण उभी ठेवुन हेतुपुरस्सर ञास देत असतात. घटनेच्या दिवशी आम्ही बाहेरून घरी परत जात असतांना घरी जाण्याचा आमच्या मार्गावर अग्रवाल यांच्या मालकीची पीकअप वाहण उभे होते. त्यामुळे दुचाकीने घरी परत जाण्यास अडचण निर्माण झाली म्हणुन माझे पती हरीश यांनी वाहण चालकास वाहण थोडे बाजुला घेण्याची विनंती केली. तेव्हा वाहण चालक पीकअप मागे घेत असतांना मनोज अग्रवाल आणि त्यांचा मुलगा शुभम अग्रवाल हे घटनास्थळी आले. तुमची नेहमीचीच कटकट असते असे म्हणत अश्लील शब्दात शिवीगाळ करत मारण्यासाठी माझ्या पतीच्या अंगावर धावुन आले. पतीला मारतील या भितीपोटी आपण मध्यस्थी करण्यास गेलो असता शुभम अग्रवाल याने माझा हात पकडला. हाताच्या कोणीने छातीला धक्का मारला. अश्लील शब्दात शिवीगाळ करत हात पिरगळण्याचा प्रयत्न केला. मनोज अग्रवाल यांनीही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व घटनाक्रमात शुभम अग्रवाल यांच्या हाताचे नख लागुन माझ्या हाताला जखम झाली. हा प्रकार अशोभनिय आणि बेकायदेशीर असुन यामुळे आमची समाजात नाहक बदनामी झाली आहे. अग्रवाल पितापुञानी जीवे मारण्याची धमकी दिल्याने भविष्यात त्यांचे पासुन आम्हाला धोका होवु शकतो, असे नमुद करत शुभम अग्रवाल आणि मनोज अग्रवाल यांचे विरूध्द कायदेशिर कारवाई करावी. अशी मागणी केली आहे. सदर तक्रारीची दखल घेत पोलीसांनी मनोज आणि शुभम अग्रवाल विरूध्द गुन्हा दाखल केला असुन अद्याप पर्यंत अटकेची कारवाई झालेली नाही. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे आणि ठाणेदार सुमित परतेकी करत आहेत. दरम्यान सदर प्रकरणातुन संरक्षण मिळण्यासाठी मनोज अग्रवाल यांनी युध्दपातळीवर प्रयत्न चालविले असुन एका राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या मार्फतीने प्रकरण दडपण्यासाठी धावपळ चालविली असल्याने होणाऱ्या कारवाई कडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here