मूल : १८ सदस्यीय कृषी उत्पन्न बाजार समिती मूलच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या २८ एप्रील रोजी होऊ घातली आहे. पालकमंञी ना. सुधीर मुनगंटीवार प्रतिनिधीत्व करीत असलेल्या बल्लारपुर विधानसभा मतदार संघात मूल तालुक्याचा समावेश होतो. त्यामूळे होऊ घातलेली निवडणुक भाजप विरूध्द काँग्रेस अशी होईल. अशी अपेक्षा होती. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या दोन वगळून इतर सर्व भाजप समर्थीत उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने होऊ घातलेली निवडणुक आता काँग्रेस विरूध्द काँग्रेस अशी होत असली तरी माञ काँग्रेसचा रावत गट सहज बाजीगर ठरेल असे दिसुन येत आहे.
२१९ मतदार असलेल्या सेवा सहकारी संस्था मतदार संघाच्या सर्वसाधारण गटातुन ७, महीला राखीव गटामधुन २, इ.मा.वा. आणि वि.जा.भ.ज. गटामधुन प्रत्येकी १ असे ११ संचालक निवडुन द्यावयाचे आहे. ७ संचालक निवडुन द्यावयाच्या सेवा सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण गटात काँग्रेस समर्थीत शेतकरी विकास आघाडीचे बाजार समितीचे तत्कालीन सभापती राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर यांचे शिवाय राजेंद्र कन्नमवार, अखील गांगरेड्डीवार, किशोर घडसे हे चार तत्कालीन संचालक पुन्हा निवडणुक रिंगणात आहेत, या गटामधुन सुनिल गुज्जनवार आणि हसन वाढई प्रथमच नशीब अजमावत आहेत. काँग्रेस समर्थीत शेतकरी विकास आघाडीच्या या सात उमेदवारांना किसान विकास आघाडीच्या किरण पोरेड्डीवार, सुधाकर बांबोळे आणि पराग वाढई यांचेशी सामना करावा लागत आहे. २ संचालक निवडुन द्यावयाच्या सेवा सहकारी संस्थेच्या महीला राखीव गटात ३ उमेदवार रिंगणात आहेत. या गटात काँग्रेस समर्थीत शेतकरी विकास आघाडीच्या चंदा कामडी आणि ऊषा शेरकी यांचे विरूध्द किसान विकास आघाडीच्या वनिता हरडे रिंगणात आहेत. १ संचालक निवडुन द्यावयाच्या इतर मागासवर्गीय गटात काँग्रेस समर्थीत शेतकरी विकास आघाडीचे सुमीत आरेकर विरूध्द किसान विकास आघाडीचे नरेंद्र चौधरी आणि विजा/भज गटात शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार, बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप कारमवार यांना किसान विकास आघाडीचे पंकज पुल्लावार यांचेशी सामना करावा लागणार आहे. सेवा सहकारी संस्था मतदार संघात तालुक्यातील मूल, बेंबाळ, भेजगांव, नवेगांव भुजला, फिस्कुटी, चिखली, चिरोली, जुनासुर्ला, सुशी दाबगांव, राजगड, गडीसुर्ला, चांदापुर, डोंगरगांव, मारोडा, राजोली आणि नांदगांव अश्या एकुण १७ सेवा सहकारी संस्थेच्या २१९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तालुक्यातील १७ पैकी १६ सेवा सहकारी संस्था काँग्रेसच्या ताब्यात असुन भाजपाच्या ताब्यात असलेल्या राजोली सेवा सहकारी संस्थेत १३ पैकी ६ सदस्य काँग्रेस विचाराचे आहेत. त्यामुळे एकुण ११ संचालक निवडुन द्यावयाच्या सेवा सहकारी संस्था मतदार संघात सध्यास्थितीत काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीचे पारडे जड दिसुन येत आहे.
४ संचालाक निवडुन द्यावयाच्या ग्राम पंचायत मतदार संघात एकुण तीन गटात निवडणुक होणार आहे. ४२५ मतदार असलेल्या ग्राम पंचायत मतदार संघाच्या सर्वसाधारण गटात एकुण २ संचालक निवडुन द्यायचे आहे. या गटाच्या २ जागेसाठी ४ उमेदवार रिंगणात असुन काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीचे राहुल मुरकुटे आणि लहुजी कडस्कर यांना किसान विकास आघाडीचे राकेश दहीकर आणि स्वतंत्र निवडणुक लढवित असलेले भाजपाचे रंजीत समर्थ यांचा सामना करावा लागत आहे. ग्राम पंचायत मतदार संघाच्या प्रत्येकी १ संचालक निवडुन द्द्यावयाच्या अनुसुचित जाती/जमाती करीता राखीव असलेल्या गटात ३ उमेदवार रिंगणात आहेत. या गटात काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीचे शालीक दहीवले विरूध्द किसान विकास आघाडीचे अरविंद वनकर आणि भाजपाचे प्रशांत बांबोळे स्वतंत्र उमेदवार यांचेत सामना रंगणार असुन आर्थीक दृष्ट्या दुर्बल गटात काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीचे जालींदर बांगरे विरूध्द किसान विकास आघाडीचे भुपेश दुर्गे यांचेत सरळ लढत होणार आहे. तालुक्यातील ४९ ग्राम पंचायतीचे ४२५ सदस्य या गटात मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यातील ४९ ग्राम पंचायतीपैकी सर्वाधिक ग्राम पंचायती काँग्रेसच्या ताब्यात असुन काही ग्राम पंचायती भाजपाकडे आहेत. होऊ घातलेल्या बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी दाखल केलेल्या भाजपा समर्थीत उमेदवारांनी मतदानापुर्वीच उमेदवारी मागे घेतल्याने या गटातील भाजपा विचाराचे मतदार सध्यास्थितीत संभ्रमात सापडले आहे.
१९४ मतदार असलेल्या अडते-व्यापारी मतदार संघात २ संचालक निवडायचे आहेत. या संघात २ जागेसाठी ४ उमेदवार रिंगणात असुन या संघात अडते आणि व्यापारी असा सामना रंगणार आहे. कासु वेंकन्ना साईलु आणि अमोल बच्चुवार या दोन व्यापाऱ्यांना तुलाराम घोगरे आणि सुधाकर मोहुर्ले या दोन अडत्यांशी सामना करावा लागणार आहे. कासु वेंकन्ना आणि अमोल बच्चुवार यांना राईस मील आणि धान व्यापारी असोसिएशनने एकमताने पाठींबा दिला आहे. मतदार संघात व्यापारी आणि अडत्यांचे समसमान मतदार असल्याने कुंपणावर असलेल्या काही मतदारांच्या हाती या संघातील उमेदवारांचे नशीब अवलंबून आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी या संघात आर्थिक व्यवहार होतील. असे बोलल्या जात आहे. ७२ मतदार असलेल्या हमाल तोलारी मतदार संघातुन रमेश बरडे हे अविरोध निर्वाचित झाल्याने येत्या २८ एप्रील रोजी बाजार समितीच्या १७ संचालक पदासाठी मूल येथील बाल विकास प्राथमिक शाळेतील वेगवेगळ्या ३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणुक निर्णय अधिकारी तहसिलदार डाँ. रविंद्र होळी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी राजु कुमरे आणि ठाणेदार सुमित परतेकी सहका-यांचे मदतीने निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्नरत आहेत. घोडामैदान जवळच असुन काँग्रेस समर्थीत शेतकरी विकास आघाडीच्या १५ उमेदवारांना दोन भाजपा समर्थक वगळल्यास जिल्ह्यातील एका काँग्रेस नेत्याच्या नेतृत्वात ९ उमेदवारांचा सामना करावा लागत आहे. त्यामूळे जिल्हा परीषदेच्या सत्ताकाळात राम लक्ष्मण म्हणुन ओडखली जाणारी जोडी होऊ घातलेल्या बाजार समिती निवडणुकीत माञ कौरव पांडवा सारखी एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. शेवटी विजय सत्याचाच ख-याखु-या काँग्रेसी पांडवाचा होईल.अशी चर्चा आहे.