मूल : शहरी भागातील खेळाडुंच्या तुलनेत ग्रामीण भागातील खेळाडु मागे नाहीत म्हणुन तालुक्यातील युवकांमध्ये विविध खेळांची आवड निर्माण व्हावी आणि त्यामाध्यमातुन तालुक्यातील युवकांना राज्य व देश पातळीवर खेळण्याची संधी मिळावी. या उद्देशाने युवाशक्ती व्यायाम मंडळ नेहमी वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धेचे आयोजन करीत असते. असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.
युवाशक्ती व्यायाम मंडळ मूलच्या वतीने आयोजीत खुल्या कबड्डी सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. तीन दिवसीय खुल्या कबड्डी सामन्यांचे उदघाटन आज माजी आमदार जैनुद्दीनभाई जव्हेरी यांचे हस्ते पार पडले. युवाशक्ती व्यायाम मंडळाचे अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उदघाटन कार्यक्रमास संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे माजी तालुकाध्यक्ष राकेश रत्नावार, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखील गांगरेड्डीवार, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार, सेवा सहकारी संस्था दाबगांवाचे अध्यक्ष किशोर घडसे, आदर्श खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम भुरसे, तालुका मेडीकल प्रँक्टीशनर असोसिएशनचे अध्यक्ष डाँ. सुभाष रेड्डीवार, सचिव डाँ. विनोद चौधरी, माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, मंडळाचे ज्येष्ठ सदस्य दिलीप पुल्लकवार, राजुपाटील मारकवार, माजी नगरसेवक बाबा अझीम आदी मंचावर उपस्थित होते. पटांगणाचे पुजन आणि फित कापुन माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांनी सामन्यांचे उदघाटन केले. माजी आमदार जैनुद्दीनभाई जव्हेरी यांनी उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना माजी आमदार जव्हेरी यांनी आयोजकांचे आभार आणि खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. मंडळाचे सचिव चतुर मोहुर्ले यांनी प्रास्ताविक करतांना मंडळाचा चौतीस वर्षाच्या कार्याचा लेखाजोगा मांडला. यावेळी राकेश रत्नावार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले यांनी तर मंडळाचे कोषाध्यक्ष गुलाबखाँ पठाण यांनी मानले. उदाघाटनीय सामना आयोजक युवाशक्ती व्यायाम मंडळ विरूध्द श्रीराम बालक आखाडा बल्लारापुर यांचेत झाला. या सामन्यामध्ये बल्लारपुरचा संघ विजयी झाला. सामन्याच्या यशस्वीतेसाठी प्रविण चेपुरवार, विलास पुल्लकवार, रामु बुर्रीवार, चंदु चटारे, वसंत मोहुर्ले, दिपक चुगाणी, राजेश रावत, तेजस महाडोळे, प्रविण खानोरकर, अनिल समर्थ, पंकज कोहळे, विजय कानमपल्लीवार, रवि शेंडे, मनोज गुंज्जनवार, गुड्डु महाडोळे, नत्थु शेंडे, निखील फटींग आदी परीश्रम घेत आहेत.