मूल – ग्रामीण भागातील युवकांसाठी क्रिकेट,कबड्डी,व्हॉलीबॉल, अशा क्रीडा खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केल्यानेच ग्रामीण युवकांचा शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास होत असतो असे मार्गदर्शन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी राजोली येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन करतांना केले. छत्रपती शिवाजी राजे क्रीडा मंडळ राजोली यांचे वतीने आयोजित भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अशोक पुल्लावार, प्रमुख अतिथी दीपप्रज्वलन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील गुज्जनवार, ग्राम पंचायत उपसरपंच गजानन पा. ठीकरे, पंचायत समिती माजी उपसभापती गजानन वलकेवार, राजोली काँग्रेसचे अध्यक्ष श्याम पुठावार, कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष हितेश पाटील ठीकरे, उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून एम. शरिफभाई, शीतल संगिडवार, अरुण आळे, बंटी नीकूरे, अजिंक्य पा. ठीकरे, धीरज शेंडे, सचिन वलकेवार, एकनाथ टिकले, रामभाऊ कोटरंगे, नागोराव सिद्धम, रजुभाऊ कुळमेथे, केशव कुळमेथे, संजय कल्याम व मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.