शिस्त, कौशल्य आणि संयम बाळगल्यास प्रगती साधता येते- संतोषसिंह रावत

137

मूल : प्रबळ इच्छाशक्ती, दांडगा उत्साह आणि परिश्रम करण्याची मानसिकता असल्यास युवकाला सहजरित्या प्रगती साधता येते याशिवाय अंगी शिस्त, कौशल्य आणि संयम बाळगल्यास विविध खेळांमध्येंही यश संपादन करता येते, याची प्रचिती संपन्न झालेल्या कबड्डी सामन्यांमधुन युवकांनी दाखवून दिले. असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले. स्थानिक युवाशक्ती व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजीत तीन दिवसीय खुले कबड्डी सामन्यांच्या समारोप व बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव दिलीप रामीडवार, मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक तथा भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे अध्यक्ष संदिप गड्डमवार माजी सैनिक कॅप्टन विलास देठे, जैन फाउडेंशनचे विजय तेलरांधे आणि प्रविण गोविंदवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर, तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष गुरूदास गुरनूले, विविध कार्यकारी संस्थेचे संचालक राजेंद्र कन्नमवार, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोर घडसे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळाचे सचिव चतुर मोहुर्ले यांनी केले. यावेळी बॅंकेचे संचालक रविंद्र शिंदे आणि संतोषसिंह रावत यांनी मनोगत व्यक्त केले. तीन दिवसीय कबड्डी सामन्यांमध्यें अंतीम सामना नागपूर येथील एकलव्य क्रिडा मंडळ विरूध्द चंद्रपूर येथील साईबाबा क्रिडा मंडळामध्यें रंगला, अंतीम सामन्यामध्यें नागपूर येथील एकलव्य क्रिडा मंडळ विजेता तर चंद्रपूर येथील साईबाबा क्रिडा मंडळ उपविजेता ठरला. विजेता एकलव्य क्रिडा मंडळ नागपूर यांना संतोषसिंह रावत यांचे कडून रोख ६१ हजार रूपये आणि आकर्षक देवून सन्मानीत करण्यांत आले तर उपविजेत्या साईबाबा क्रिडा मंडळ चंद्रपूर यांना राकेश रत्नावार, राजेंद्र कन्नमवार, किशोर घडसे आणि धनंजय चिंतावार यांचे कडून रोख ४१ हजार आणि आकर्षक देवून मान्यवरांचे हस्ते गौरवण्यांत आले. शशांक वानखेडे (नागपूर) याला उत्कृष्ठ खेळाडू, उत्कृष्ठ रायडर म्हणून सारंग देशमुख (नागपूर) आणि यश लोखंडे (चंद्रपूर) यांना प्रत्येकी ७ हजार रोख आणि चषक देवून सन्मानीत करण्यांत आले. सामन्यांच्या निमित्याने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे वतीने मंडळाचे संस्थापक सदस्य चतुर मोहुर्ले, गुलाब पठाण, प्रविण चेपुरवार, दिलीप पुल्लकवार, सुरेश हरडे, विलास पुल्लकवार, बाबा अझीम, रामु बुर्रीवार, वसंत मोहुर्ले, दिलीप नागोसे, वसंत मोहुर्ले, चंदु चटारे आणि पार पडलेल्या सामनयांमध्यें पंच म्हणून काम करणारे सुरेश मुठावार, भास्कर पेंदोर, गणेश काळे, सचिन खैरे, सचिन वावरदडपे, विकास खांडेकर, अमर रोडे आदिंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन संजय पडोळे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तेजस महाडोळे, वसंत मोहुर्ले, खालीद शेख, प्रविण खानोरकर, रविंद्र. शेंडे, गुडू येरमे, आदिंनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here