माजी सैनिकांनी साजरा केला कारगील विजय दिन

27

मूल : माजी सैनिक संघटना आणि भरारी माजी सैनिक महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक आदिवासी मूलांच्या वसतीगृहातील सभागृहात अमर विरांच्या सन्मानार्थ कारगील विजय दिन साजरा करण्यांत आला. वसतीगृहाचे गृहपाल प्रशांत फरकाडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष एकनाथ गडेकर, ज्येष्ठ सैनिक मारोतराव कोकाटे, सुनिल नगराळे, सचिव बाबा सुर, सल्लागार सहदेव रामटेके, भरारी महीला बचत गटाच्या अध्यक्षा अंजली सुर आणि उपाध्यक्ष पुष्पा जंबुलवार, प्रशांत पाटील आदि उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते कारगिल युध्दात अमर झालेल्या सैनिकांच्या अमर स्मृतीस अभिवादन करण्यांत आले. संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गडेकर यांनी कारगील युध्दात शहीद झालेल्या सैनिकांच्या बलीदानाची आठवण आणि उल्लेखनीय कामगिरी करणा-या सैनिकांच्या सन्मानार्थ कारगील विजय दिन साजरा करीत असल्याचे सांगीतले. यावेळी मान्यवरांनी कुटूंबापासून कोसो दूर राहून जीवाची तमा न बाळगता देशाच्या सिमेवर पहारा देणा-या सैनिकांमूळे देश आणि जनता सुरक्षीत जीवन असून त्यांच्या त्यागाला तोड नाही. नसल्याचे मत व्यक्त करतांना उपस्थित माजी सैनिकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचलन पुरूषोत्तम चलाख यांनी तर विजय भसारकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला बचत गटाच्या सचिव कवीता मोहुर्ले, करूणा खोब्रागडे, प्रतिभा भसारकर, उज्वला रंगारी, आशा चलाख, संदीप परचे, गावतुरे, मंजुषा कोकोटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला निमंत्रीत आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here