मुल – ०९ ऑगस्ट २२४ रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून संतोषसिंह रावत मित्र परिवारच्या वतीने दहावी, बारवी व पदवीधर झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा तथा विद्यार्थी मेळावा शुक्रवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मूल येथील कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे निवृत्त संचालक गोंडवाना विद्यापीठ यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संतोषसिंह रावत अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मुख्य मार्गदर्शक मा. नितेश कराळे सर फिनीक्स अकॅडेमी वर्धा, प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. प्रशांत ठाकरे सहाय्यक प्राध्यापक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, प्रमुख उपस्थिती मा. संदीप गड्डमवार, अध्यक्ष भारत शिक्षण मंडळ सावली, व प्रमुख अतिथी अँड. अनिल वैरागडे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मूल मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहेत.
शैक्षणिक दृष्ट्या जीवनाला नवी आशा, दिशा आणि वैचारिक आत्मविश्वास प्रेरित करण्यासाठी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व पालक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि वैचारिक बोध घेणारे नागरिक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन संतोषसिंह रावत मित्र परिवारच्या आयोजन समितीने केले आहे.
Home Breaking News ९ आँगस्ट क्रांति दिनाचे निमित्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व विद्यार्थी मेळावा, नितेश...