स्पर्धेत उतरायचे असेल तर प्रामाणिक प्रयत्न आणि परीश्रमाची गरज- नितेश कराळे

21

मूल : उराशी बाळगलेल्या स्वप्नाच्या पुर्ततेच्या स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर आवडीच्या शिक्षणाची निवड करून परीश्रमासोबतच प्राणामिकपणे अभ्यास करा आणि ध्येय साध्य होण्यास फार काळ लागत नाही. असा विश्वास राज्यातील प्रसिध्द वक्ते नितेश कराळे यांनी व्यक्त केला.
संतोषसिंह रावत मित्र परिवाराच्या वतीने स्थानिक कन्नमवार सभागृहात पार पडलेल्या गुणवंत विदयार्थी गौरव सोहळा तथा विदयार्थी मेळाव्या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून नितेश कराळे बोलत होते. क्रांती दिना निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन गोंडवाना विदयापीठाचे निवृत्त संचालक डॉ.एन.एस.कोकोडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.अनिल वैरागडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी सभापती घनश्याम येनूरकर, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरू गुरनूले, माजी जि.प. सदस्य जयंतराव जोगी, ममता रावत आदीची उपस्थिती होती.
सरस्वती पुजन, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी अशोक येरमे आणि वैष्णवी रणदिवे यांनी शारदा स्तवन सादर केले. जागतीक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन आदिवासी समाजाच्या कवीता विजय कुमरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल मान्यवरांचे हस्ते कविता कुमरे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नितेश कराळे म्हणाले, विदयार्थ्यांनी निष्ठा आणि माणूसकी निर्माण केली पाहिजे.आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय आणि परिश्रमाशिवाय पर्याय नाही. शेती करा आणि शेतीला पुरक व्यवसायाची जोड दया. अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे आयुष्यातील चढ उतार सहन करा असा मौलिक सल्ला त्यांनी विदयार्थ्यांना दिला. आपल्या व-हाडी बोलीत आणि विनोदी, मार्मिक भाष्य करीत त्यांनी विदयार्थ्यांना दोन तास खिळवून ठेवले. त्यांच्या प्रत्येक वाक्याला विदयार्थ्यांनी टाळया वाजवून तेवढीच दाद दिली. कोणतीही गोष्ट बलिदानाशिवाय मिळत नाही. कष्टाने विद्वत्ता निर्माण करता येते ,असे प्रतिपादन उदघाटक डॉ.एन.एस.कोकोडे यांनी केले. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी विदयार्थ्यांना मनात जिद्द ठेवून यश संपादन करण्याचे मत व्यक्त केले. यावेळी संतोषसिंह मित्र परिवाराच्या वतीने नितेश कराळे, डॉ.कोकोडे, अँड.अनिल वैरागडे यांचा शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावी आणि पदवी वर्षात प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या गुणवंत विदयार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल शेरकी यानी केले. संचालन संजय पडोळे आणि आभार गुरू गुरनूले यांनी मानले. कार्यक्रमाला विदयार्थी, पालक, नागरिक आणि संतोष सिंह रावत मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्तमानपत्राचे वाचना अभावी मी स्पर्धा परिक्षेत कमी पडल्याची जाहीरपणे मान्य करतांना नितेश कराळे यानी विदयार्थ्यांना वर्तमानपञाचे नियमित वाचन करतांना अनावश्यक जाहीराती न वाचता संपादकीय पानावारील तज्ञाचे साहीत्य वाचा. वर्तमानपत्रातून आपल्याला राष्ट्रीय, आंतरराष्टीय, क्रीडा आणि महत्वाच्या घडामोडी माहित होतात. सामान्य ज्ञान हे वर्तमानपत्रातून नियमित मिळत असते. असे सांगत वर्तमान पञाचे महत्व कथन केले. तसेच कराळे यांनी विविध महत्वाच्या घडामोडी आणि स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करावी हे त्यांनी आपल्या मार्मिक देह बोलीतून विदयार्थ्यांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here