श्रीकृष्ण हुड्डा यांची सेवानिवृत्त कर्मचारी सेलच्या सोनीपत विधानसभाध्यक्ष पदावर निवड

13

मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत वाहन चालक पदावर सेवारत राहीलेले, बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे एकेकाळचे विश्वासु आणि खंदे सहकारी श्रीकृष्ण हुड्डा हे काही महीण्यांपुर्वी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर ते त्यांचे स्वगांवी (सोनीपत-हरीयाणा) स्थायी झाले. दरम्यान त्यांची काँग्रेस पक्षाविषयीची निष्ठा आणि कार्ये लक्षात घेवुन हरीयाणा प्रदेश काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष उदयभान आणि सेवानिवृत्त कर्मचारी सेलचे प्रदेशाध्यक्ष महावीर मलीक यांच्या संमतीने सोनीपत जिल्ह्याचे अध्यक्ष विजेंदर मलीक यांनी सेवानिवृत्त कर्मचारी सेलच्या सोनीपत विधानसभा मतदार संघाच्या सेवानिवृत्त कर्मचारी सेलच्या अध्यक्ष पदावर श्रीकृष्ण हुड्डा यांची निवड केली. निवडी बद्दल श्रीकृष्ण हुड्डा यांनी हरीयाणा प्रदेश काँग्रेस पार्टीच्या आणि सेवानिवृत्त कर्मचारी आघाडीच्या सर्व पदाधिका-यांचे आभार मानले आहे.,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here