मूल – थोर महात्मे महात्मा फुले, राजा राममोहन रॉय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे बद्दल अवमानकारक वक्तव्य करून प्रक्षोभक विधानाने सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दखल करावे व अटक करावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने अनेक समता समाज बांधवांच्या उपस्थितीत मुल पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन ठाणेदार सुमित परतेकी यांना देऊन केली आहे. याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रा.विजय लोनबले, महिला कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, भूमिपुत्र ब्रिगेडचे डॉ.राकेश गावतूरे , जि.प.माजी सदस्य व समता परिषदेचे सल्लागार प्रा.रामभाऊ महाडोळे, माजी नगराध्यक्ष वासुदेव लोनबले, सहसचिव ईश्वर लोनबले, समता परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी कैलाश चलाख, प्रा. वसंत ताजने, प्रा. गुलाब मोरे, माजी नगराध्यक्ष वासुदेव लोनबले, दलीत जनबंधू, शहराध्यक्ष राकेश मोहुर्ले, रामदास गुरनुले, ईश्वर लोनबले, प्रशांत भरतकर, प्रा. राजेश्वर राजुरकर, देवराव ढवस, गुरुदास गुरनुले, डॉ.पद्माकर लेंनगुरे, प्रा.प्रभाकर धोटे, डेव्हिड खोब्रागडे, परशुराम शेडे, सीमा लोनबले, दुष्यंत महाडोळे, पवन गुरनुले, संदीप मोरे मंगेश मोहर्ले, प्रतीक गुरनुले, ओमदेव मोहुर्ले, रोहिदास वाढई, यांचेसह समता परिषदेचे अनेक पदाधिकारी बहुजन समाजातील अनेक युवक बांधव उपस्थित होते.