देशाच्या सिमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांमूळे जनता सुरक्षित-प्रभाकर भोयर, मूल येथे पार पडला कारगील विजय दिन

73

मूल : तहान भुक आणि ऊन्ह, थंडी आणि पावसाची तमा न बाळगता कुटूंबापासुन कोसो दुर राहुन देशाच्या सिमेवर कडक पहारा देणाऱ्या सैनिकांमूळे देशातील जनता सुरक्षित व बिनधास्त जीवन जगत आहेत. देशाच्या सिमेवर पहारा देणाऱ्या आजी व माजी सैनिकांच्या कर्तव्याला तोड नाही. असे मत तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी व्यक्त केले.

स्थानिक माजी सैनिक संघटना आणि भरारी माजी सैनिक महीला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने अमर विरांच्या सन्मानार्थ आयोजित कारगील विजय दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष प्रभाकर भोयर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास माजी सैनिक कल्याण बहुउद्देशिय संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष हरीश गाडे, सचिव राजेंद्र भोयर, पदाधिकारी महादेव बोढे, लक्ष्मण निकुरे, तालुका अध्यक्ष एकनाथ गडेकर, भरारी महीला बचत गटाच्य पुष्पा जंबुलवार आदी उपस्थित होते.
प्रारंभी अमर झालेल्या सैनिकांच्या स्मृतीस अमर स्मृती प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तालुकाध्यक्ष एकनाथ गडेकर यांनी प्रास्ताविकामधुन स्थानिक संघटनेच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी हरीश गाडे यांनी माजी सैनिक असल्याचा अभिमान बाळगत सिमेवर पहारा देत देशाचे रक्षण करणाऱ्या आजी व माजी सैनिकांप्रती नागरीकांनी कृतज्ञता बाळगली पाहीजे. असे मत व्यक्त केले तर अध्यक्षिय मनोगत व्यक्त करतांना प्रभाकर भोयर यांनी माजी सैनिक संघटनेला अपेक्षित असलेले सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी किसन खोब्रागडे यांनी कारगील युध्दात अजोड कामगिरी बजावलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ शासनाने शासन स्तरावर कारगील विजय दिनाचा कार्यक्रम आयोजित करावा. अशी अपेक्षा व्यक्त करत देशाभिमान गीत सादर केला. पुष्पा जंबुलवार यांनी सैनिकांच्या कर्तव्यावर प्रकाश टाकणारे गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचलन कवीता मोहुर्ले यांनी तर पुरूषोत्तम चलाख यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबा सुर आणि संघटनेच्या स्थानिक पदाधिका-यांनी परीश्रम घेतले.

कारगील विजय दिनाच्या कार्यक्रमाला वरीष्ठ शासकीय अधिका-यांना उपस्थित राहुन अमर सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करणे सोईचे व्हावे. हा दृष्टिकोन समोर ठेवुन रविवार या सुट्टीचा दिवशी कारगील विजय दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या नांवानिशी पञीकाही वितरीत करण्यात आली. तरीसुध्दा पार पडलेल्या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, तहसिलदार डाँ. रविंद्र होळी, संवर्ग विकास अधिकारी देव घुनावत, ठाणेदार सुमित परतेकी आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर आदींनी गैरहजेरी दर्शवली. याविषयी अनेकांनी खंत व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here