मूल-नागपूर राज्य परीवहन महामंडळाची बस सेवा सुरू, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाला यश, विद्यार्थी आणि नागरिकांनी मानले ना.मुनगंटीवार यांचे आभार

96

मूल : आर्थिक दृष्ट्या तोट्याची असल्याचे कारण सांगुन अनेक वर्षापासुन बंद केलेली मूल नागपूर बस सेवा पालकमंञ्याच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाल्याने विद्यार्थी आणि महीलांसह ज्येष्ठ नागरीकांनी आनंद व्यक्त केला आहे. मूल-नागपूर या मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस सेवा सुरू करण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.

मूल ते नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय कामानिमित्ताने मूल-नागपूर असा प्रवास करणाऱ्या नागरिकांचीही संख्या जास्त आहे. पुर्वी पाच ते सहा फेऱ्यांमध्ये सुरू असलेली मूल नागपूर थेट बस सेवा खाजगी बस सेवेमूळे आर्थिक दृष्ट्या परीवहन महामंडळाला तोट्यात जात होती, त्यामूळे परीवहन महामंडळाने अंदाजे ८ ते १० वर्षापुर्वी मूल नागपूर बस सेवा बंद केली होती, त्यामूळे ज्येष्ठ नागरीकांसह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. परीवहन महामंडळाची बस सेवा सुरू नसल्याने नागरीकांना तुटक प्रवास करत ञास सहन करावा लागत होता. प्रवाश्यांची अडचण आणि संख्या लक्षात घेवुन खाजागी बस मालकांनी मूल ते नागपूर मोठ्या प्रमाणात खाजगी बस सेवा सुरू केली. त्यामूळे नागरीकांना थेट प्रवासाची सोय मिळत आहे. परंतु प्रवाश्यांच्या अडचणीची संधी साधुन अलीकडे खाजगी बस चालक मालक आणि वाहकांनी प्रवाश्यांना या ना त्या कारणाने ञास देणे सुरू केले. त्यामूळे प्रवाशीही खाजगी बस सेवेला कंटाळले होते परंतु अधिकृत बस सेवे अभावी प्रवाश्यांना साधन नसल्याने मजबुरी का नाम… म्हणत ञास सहन करत खाजगी बसनेच प्रवास करीत होते. प्रवाश्यांना होत असलेला ञास आणि अडचण लक्षात घेवुन ना. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला तत्काळ बस सेवा सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. या आदेशानुसार एसटी महामंडळाने सकाळी सव्वा सहा वाजता, सकाळी साडे सात वाजता आणि सकाळी दहा वाजता मूलवरून नागपूरसाठी तर दुपारी दोन वाजता, सायंकाळी साडे चार वाजता आणि सायंकाळी साडे पाच वाजता नागपूरवरून मूलसाठी बस सोडण्यात येणार आहे. मूल-नागपूर मार्गावर एसटी बस सेवा सुरू केल्याने मूल पासुन पुढे नागपूर पर्यंत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महीला आणि विद्यार्थ्यांची अडचण दुर झाली आहे. त्यामूळे नागरीकांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here