अंत्यसंस्कारा करीता जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यु, ट्र्ँक्टरची ट्राली पोटावरून गेल्याने घडला अपघात

79

मूल : गांवातील एका महीलेच्या अंत्यसंस्कारा ट्र्ँक्टरने नदीकडे जात असताना ट्र्ँक्टर वरून तोला जावुन खाली पडल्याने झालेल्या अपघाता मध्ये एका युवकाचा मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील बेंबाळ येथे घडली. नयन अनिल मारगोनवार (२०) असे मृतकाचे नांव आहे.

बेंबाळ येथील बोमनवार नामक महीलेचे काल निधन झाले. गांवापासुन अंदाजे ३ कि.मी. अंतरावर असलेल्या कोरंबी लगतच्या वैनगंगा नदीवर मृतक महीलेला एमएच-३४-एपी-११०८ क्रमांकाच्या ट्र्ँक्टरने अंत्यसंस्कारा घेवुन जात असताना आज सकाळी १०.३० वा. चे दरम्यान सदरचा अपघात घडला. मृतक नयन अनिल मारगोनवार हा इतरांसोबत अंत्यसंस्कार करीता जाण्यासाठी अपघातग्रस्त ट्र्ँक्टरच्या चालकाजवळ बसला होता. दरम्यान विरूध्द दिशेने येत असलेल्या दुचाकीला रस्ता देण्यासाठी चालक चिंतामन लहु राऊत याने ट्र्ँक्टर रस्त्याच्या कडेला उतरविण्याचा प्रयत्न करताच चालका बाजुला बसलेल्या नयन अनिल मारगोनवार हा तोल जावुन खाली पडला. त्याचक्षणी लोंकानी भरलेली ट्र्ँक्टरची ट्राली नयनच्या पोटावरून गेल्याने तो अत्यवस्थ झाला. सदर घटना लक्षात येताच जखमी नयनला तातडीने उपचारार्थ मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु लोंकानी भरलेली ट्र्ँक्टरची ट्राली नयनच्या पोटावरून गेल्याने उपजिल्हा रूग्णालयात पोहोचण्या पुर्वीच नयनची अर्ध्या मार्गातच प्राणज्योत मालवली. मृतक नयन अनिल मारगोनवार हा मूल पंचायत समितीचे माजी सभापती चंदु मारगोनवार यांचा पुतण्या आहे. त्याचे पश्चात आई वडील आणि दोन बहीणी व बराच मोठा परीवार आहे. मृतक नयन हा बि.ए.ला शिक्षण घेत होता. नयन हा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे मारगोनवार कुटूंबावार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामस्थांसोबत अंत्यसंस्कारा करीता जात असताना नयनचा अपघाती मृत्यु झाल्याने गांवात हळहळ व्यक्त करण्यात येत असुन ग्रामस्थांसोबत अंत्यसंस्कारास उपस्थित राहणाऱ्या नयनच्या अंत्यसंस्कारा करीता आता ग्रामस्थांना उपस्थित राहावे लागण्याचा दुदैव प्रसंग बेंबाळवासियांवर आला आहे.,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here