मूल : स्थानिक पातळीवर आवश्यक उपचार न मिळाल्याने प्रकृती ढासळत जावुन कालातंराने सहचारीणीचे निधन झाले. असा दुदैवी प्रसंग परीसरातील कोणत्याही व्यक्तीवर ओढवु नये, ही संभवना लक्षात घेवुन स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, धान उद्योजक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक हिरेन शहा (गोगरी) यांनी जनतेची मागणी आणि रूगालयाची गरज लक्षात घेवुन दिवंगत सहचारीणी सौ. हिना गोगरी हिच्या स्मृती प्रित्यर्थ स्थानिक उपजिल्हा रूग्णालय येथे सर्व सोयीने युक्त दक्षता कक्षाची निर्मीती करून दिली. सोबतच रूग्णालयात येणाऱ्या नागरीकांना शुध्द आणि थंड पाणी पिण्यास मिळावे म्हणुन वाँटर कुलर आणि प्रकृतीच्या काळजीत असलेल्या रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मनोरंजना मधुन काळजी दुर व्हावी. हा विधायक उद्देश समोर ठेवुन टि.व्ही. भेट दिली. स्मृती प्रित्यर्थ दिलेल्या सर्व साहित्याचे लोकार्पण गुढी पाडव्याच्या शुभ दिनी प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डाँ. देवेंद्र लाडे यांचे शुभहस्ते पार पडले. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात रूग्णालय प्रशासनाच्या वतीने डाँ. तिरथ उराडे यांनी दक्षता कक्षाच्या उपयोगीतेविषयी मत व्यक्त केले तर प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाँ. देवेंद्र लाडे यांनी रूग्णालय प्रशासनाला वस्तुरूपात सहकार्य केल्या बद्दल हिरेन (गोगरी) शहा आणि कुटूंबियाप्रती आभार मानले. यावेळी हिरेन शहा आणि त्यांचे चि. योग यांचेशिवाय बाजार समितीचे माजी सभापती राकेश रत्नावार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले, माजी संचालक जीवन कोंतमवार, न.प.चे माजी सभापती प्रशांत समर्थ, प्रशांत लाडवे, डाँ. वासीम शेख, डाँ. दिनेश व-हाडे, वैद्यकिय व्यवसायी सचिन चिंतावार, विजय केशवाणी, महेश पटेल, नितीन राजा, अँड,अश्वीन पौलीकर, रूपेश मारकवार आणि मिञ परीवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.