एस.टी.बस नंतर आता ट्रॅव्हल्समध्येही महिलाना ५०% प्रवास सवलत, चंद्रपूर-गडचिरोली ट्र्ँव्हल्स असोशिएशनची घोषणा

71

मूल : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणा-या महिलांना ५० टक्के सवलत देण्याच्या शासनाच्या घोषणे नंतर आता चंद्रपूर गडचिरोली टॅव्हल्स असोशिएशननेही ट्र्ँव्हल्सने प्रवास करणा-या महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्याची घोषणा केली असुन गुढीपाडव्या पासुन सवलत योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याने महिलांनी सदर घोषणेचे स्वागत केले आहे.

महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणा-या महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करून त्याची अंलबजावणी सुरू केली आहे. शासनाच्या या घोषणेमूळे राज्य परीवहन महामंडळाच्या बस मध्ये महीलांची गर्दी वाढली आहे. एस.टी.बस मधील महीलांच्या वाढत्या गर्दीमूळे ट्र्ँव्हल्स मधील प्रवाश्यांची गर्दी कमी होऊ लागल्याने व्यवसायावर संक्रात येण्याच्या भितीने शासनाच्या सवलत योजनेचा कित्ता गिरवत चंद्रपूर गडचिरीलो ट्रॅव्हल्स असोसिएशनने ट्र्ँव्हल्सने प्रवास करणाऱ्या महिलाकरिता तिकिटमध्ये ५० टक्के प्रवास सवलत देण्याची घोषणा केली आहे.

चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या सदस्यांनी स्थानिक कन्नमवार सभागृहात झालेल्या बैठकीत चर्चा करून प्रवास सवलत देण्याचा जनहिताचा निर्णय घेतला असुन सदर निर्णयाची अंमलबजावणी गुढीपाडव्या पासुन करण्याचे जाहीर केले आहे. महिलांनी ट्र्ँव्हल्स मधील प्रवास सवलतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले आहे. यावेळी चंद्रपूर गडचिरोली ट्र्ँव्हल्स असोसिएशनचे चंदन पॉल, निखिल बोहरा, श्याम उराडे, विलास कागदेलवार, महेश जेंगठे, मार्तंड कापगते, साई गुंडोजवार, लुकेश अडपल्लीवार, मोहसीन खान, काजू खोब्रागडे, पप्पू पठाण, विजय चिलके, बालू चरडे, अभिजीत कावळे, दीपक महाडोळे आदी उपस्थित होते. चंद्रपूर गडचिरोली महामार्गाने खाजगी ट्र्ँव्हल्स बसने प्रवास करतांना आता महीलांनाही ५० टक्के रक्कम द्यावी लागणार असल्याने महीलांनी समाधान व्यक्त केले असुन ट्र्ँव्हल्स मालकांप्रती आभार व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here