मूल : ज्या देशात साक्षात परमेश्वराने भगवद गीता ऐकवली तो संस्कारक्षम भारत देश महान असुन ऋषी मुनींच्या तपस्या आणि सिध्दीने पविञ झालेली सर्व धर्म समभाव जोपासणारी देव भुमी आहे. त्या देशाचा धर्म ग्रंथ असलेला श्रीमद भगवदगीता सर्व धर्मग्रंथाचा पाया असल्याचे मत डाँ. राजऋषी बसवराज यांनी व्यक्त केले.
प्रजापीता ब्रम्हाकुमारी सेवा केंद्र मूलच्या वतीने कला आणि सांस्कृतिक विभाग माऊंट आबु यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात डाँ. राजऋषी बसवराज बोलत होते.
भारताची संस्कृती महान असुन विदेशात संस्कृतीच जोपासल्या जात नाही. अशी वास्तविकता असतांना भारतात शिक्षण घेवुन भारतीय युवक विदेशात नोकरीसाठी जातात. यावर खेद व्यक्त करतांना डाँ. राजऋषी बसवराज यांनी देवळात जावुन देव शोधण्यापेक्षा मानवात देव शोधा. असे आवाहन केले.
स्थानिक कर्मवीर कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात संपन्न झालेल्या भगवद गीता एक जीवन संदेश तथा सांस्कृतिक कार्यक्रमास माऊंट आबु येथील कला आणि सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष भाई दयालजी, मुख्यालय समन्वयक भाई सतिशजी, गायक भाई नितीनजी, लिला दिदी, जिल्हा प्रमुख कुंदा दिदी यांचेसह मूलचे माजी नगराध्यक्ष अरविंद बोकारे आणि रत्नमाला भोयर उपस्थित होत्या.
प्रार्थना गीत आणि बालीकांच्या स्वागत नृत्याने प्रारंभ झालेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांनी दिप प्रज्वलीत करून केला. यावेळी कला आणि सांस्कृतिक विभाग अध्यक्ष भाई दयाल यांनी मणुष्य हा चोवीस तासाचा कलाकार असुन जीवन जगतांना प्रत्येक मणुष्य हा आवश्यकते नुसार भुमीका पार पाडत असतो. असे मत व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर आणि जिल्हा प्रमुख कुंदा दिदी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन शालु दिदी यांनी तर उपस्थितांचे आभार भाई मोरेश्वर आकनुरवार यांनी मानले. कार्यक्रमात भाई सतिशजी आणि भाई नितीनजी यांनी प्रबोधनपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश रायकंटीवार, मनोहर कामडे, दिलीप अलगुनवार, जितेंद्र केशवाणी, आशिष गुलाणी, रमेश महाडोळे, वर्षा उधवाणी, हेमा गुलाणी, शारदा आक्केवार आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाला आबाल स्ञी पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.