आठ वर्षीय बालीकेवर अतिप्रसंग करणारा नराधम गजाआड, आरोपीला कडक शासन करावे. महीला संघटनांची मागणी

74

मूल : खाऊ देण्याचे आमिष दाखवुन आठ वर्षीय बालीकेवर अतीप्रसंग करणाऱ्या एका नराधमास पोलीसांनी गजाआड केले. दरम्यान बालीकेच्या अज्ञानतेचा फायदा घेवुन अतिप्रसंग करणाऱ्या आरोपी कडक शिक्षा करावी. अशी मागणी विविध महीला संघटनांनी केली आहे.

येथील पंचशील नगर वार्ड क्रं. ७ येथे वास्तव्याने असलेल्या एका कुटूंबातील ८ वर्षीय बालीका घरासमोर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या किशोर महागु गेडाम (४०) याने खाऊ देण्याचे आमीष दाखवुन तीला स्वतःच्या घरी नेवुन तिचेवर अतिप्रसंग केला. सदर प्रकाराची बालीकेच्या आईला माहीती होताच तीने आरडा ओरड केली, त्यामुळे गोळा झालेल्या नागरीकांनी आरोपी किशोर गेडाम याचे घरात प्रवेश केला तेव्हा तेथील प्रकार पाहुन नागारीकांनी किशोर गेडाम याला चांगलाच चोप दिला. सदर घटनेची तक्रार बालीकेच्या आईने पोलीसात दाखल केल्यानंतर लागलीच पोलीसांनी घटनास्थळी जावुन दुष्कृत्य करणाऱ्या किशोर गेडाम याला ताब्यात घेतले. पिडीत बालीकेला वैद्यकीय तपासणी आणि उपचारार्थ उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. पिडीत बालीकेच्या आईच्या तक्रारीवरून पोलीसांनी किशोर गेडाम (४०) याचे विरूध्द बाल लैगीक अत्याचार (पोस्को) कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपी किशोर गेडाम हा अविवाहीत असुन दारूचा व्यसनाधीन आहे. आज चंद्रपूर येथील विशेष न्यायालयात आरोपी किशोर गेडाम याला हजर केले असता न्यायालयाने आरोपी किशोर गेडाम याची तुरूंगात रवानगी केली. पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.
अलीकडे मोबाईल वापरणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात असुन प्रत्येकाकडे असलेल्या अँन्ड्राईड मोबाईल मध्ये यु ट्युब, फेसबुक सारखे वेगवेगळे अँप आहेत. या सर्व अँपमधुन पोर्न सारखे अश्लील चिञ दिसणारे अनेक माध्यम कोणत्याही खर्चाविना दिसत असल्याने अलीकडे बलात्कार आणि विनयभंग सारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे यु ट्युब आणि फेसबुक वरून होणारे अश्लीलतेचे प्रदर्शन थांबविण्यासाठी शासनाने पाऊल उचलावे. अशी मागणी सुज्ञ नागरीकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here